आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation Against Commissioner Gudewar Transfered

आयुक्त गुडेवार यांच्या बदलीविरोधात ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेचेआयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्याच्या निषेधार्थ बसपाच्या वतीने शनिवारी सायंकाळी मनपासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. गुडेवारांच्या बदलीमागे सत्ताधारी असल्याचे सांगत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी टीका केली. यावेळी काँग्रेसचे सतीश सुरवसे, बसपाचे संजीव सदाफुले, अशोक जानराव, नगरसेविका सुनिता भोसले, उषा शिंदे आदी उपस्थित होते.

नगरसेवक चंदनशिवे म्हणाले, “चांगल्या अधिका-यांची बदली व्यापा-यांच्या हितासाठी करण्यात आली. युतीच्या नेत्यांनी नागरिकांचे हित पाहिले नाही. पालकमंत्री भ्रष्टाचारी नसले तरी त्यांनी व्यापा-यांसाठी गुडेवारांची बदली केली. रेल्वेच्या जागेवरील दोन हजार कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यांच्यासाठी पालकमंत्र्यांनी आंदोलन केले नाही, ही शोकांतिका आहे. यावेळी महापालिका आवारात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. गुडेवारांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने सहाय्यक आयुक्त अमिता दगडे यांना निवेदन देण्यात आले.