आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिण्यास पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात तरी जाऊ द्या, सांगलीतील ६७ गावांची पदयात्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘कृष्णा खोरे सिंचन योजनेतून पाणी द्या; अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या’, अशी मागणी करत जत तालुक्यातील ६७ गावांतील लोकांनी बुधवारी उमदी ते सांगली पदयात्रेला सुरुवात केली.
सांगली जिल्ह्यातील ४२ गावांचा कोणत्याच सिंचन योजनेत समावेश नाही. त्यामुळे ही गावे पाण्यापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वी या गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी ‘युतीची सत्ता आल्यावर आम्ही तुम्हाला पाणी देऊ’, असे आश्वासन दिले होते. मात्र, युतीची सत्ता येऊन सहा महिने लोटले तरी सरकारने या गावांच्या पाणी प्रश्नाबाबत काहीही निर्णय घेतला नाही. सांगलीचे खासदार, जतचे आमदार भाजपचे आहेत, त्यांनीही या गावांना पाणी देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला नाही. या ४२ गावांबरोबरच आणखी २५ गावांतील लोकही पाण्यासाठी टाहो फोडत अाहेत. त्यामुळेच या गावकऱ्यांनी उमदी ते सांगली अशी पदयात्रा सुरू केली. या पदयात्रेत एक हजारहून अधिक गावकरी सहभागी झाले आहेत. शनिवारी ही पदयात्रा सांगलीत पोहोचेल.