आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात विमानसेवा शक्य, एअर इंडियाच्या विक्री अधिका-यांकडून सरव्यवस्थापकांना अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आर्थिक भौतिक गरज लक्षात घेता सोलापुरात नागरी विमानसेवा सुरू करता येईल. हे शहर विकासाच्या दिशेने झेपावत आहे. विमानसेवेचा वापर करेल, असा आर्थिकदृष्ट्या उन्नत वर्ग सोलापुरात असल्याने विमानसेवा फायदेशीर ठरू शकेल, असा सकारात्मक अहवाल एअर इंडियाच्या वाणिज्य विभागाचे विक्री अधिकारी अजित सलगरे यांनी एअर इंडियाचे मुंबईचे सरव्यवस्थापक मुकेश भाटिया यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला. येत्या काही दिवसांत अहवालावर निर्णय अपेक्षित आहे.

सोलापूर सोशल फोरम, काही उद्योजक आणि जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडून मागील आठवड्यात घेतलेल्या माहितीच्या आधारावर अजित सलगरे यांनी सोलापूर हवाई सेवेसंदर्भातील अहवाल तयार केला. सोलापूर विमानतळावरील सुविधांच्या उपलब्धतेचाही सकारात्मक उल्लेख केला आहे. विमानसेवा सुरू करण्यात कोणतीही तांत्रिक अडचण नसल्याची भूमिका त्यांच्यासमोर उद्योजकांनी मांडली होती. सोलापूरसह, रत्नागिरी, नांदेड, कोल्हापूर या शहरांत एअर इंडियाची सेवा सुरू केली जाऊ शकते, असे अहवालात नमूद केले आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गामुळे वाढता विकास, एनटीपीसी सारखा प्रकल्प उभारणीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. या सर्व बाबी विमानसेवा सुरू करण्यासाठी पूरक असल्याचा उल्लेख अहवालात आहे.

अहवाल सादर केला आहे. एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी याबाबत लवकरच निर्णय घेतील. राज्यातील शहरांत एअर इंडियाची सेवा सुरू करण्याचा विचार आहे. यात सोलापूरचा समावेश आहे. अजितसलगरे, विक्री अधिकारी, एअर इंडिया, मुंबई.

सोलापूरचेधार्मिकपर्यटन, रस्ते महामार्ग, पायाभूत सुविधा, एनटीपीसी आदी महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करून त्यांना आवश्यक ती माहिती सादर केली आहे. सोलापूर सोशल फोरम विमानसेवेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे. -परागशहा, सचिव , सोशल फोरम.

औद्योगिकप्रगती होईल
सोलापूरलाजोडणा-याप्रमुख महामार्गांचे रुंदीकरण झाले. पुण्याचा प्रवास कालावधी कमी झाला. आता हैदराबाद, बंगळुरू महामार्ग रुंदीकरणाचे कामही हाती घेण्यात आले. अशा स्थितीत विमानसेवा सुरू झाल्यास मोठे उद्योजक सोलापुरात येऊ शकतील. मूबलक पाणी, वीज मिळाल्यास त्यांची उत्पादन केंद्रे आणतील. -डी. राम रेड्डी, सहव्यवस्थापकीय संचालक
बालाजी अमाईन्स
लवकर सुरू व्हावी

सोलापूरलाविमानसेवेचीगरज आहे. यासाठी सोशल फोरमकडून पाठपुरावा सुरूच आहे. सुशीलकुमार शिंदे यांनीही त्यात लक्ष घातले. त्यामुळेच एअर इंडियाला दखल घ्यावी लागली. आम्ही कंपनीच्या प्रतिनिधींना विश्वास दिला. लवकर सेवा सुरू व्हावी, ही अपेक्षा. - यतीन शहा, अध्यक्ष, प्रिसिजन कॅमशाफ्टस