आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावपट्टी नकाशाचे काम अंतिम टप्प्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन लवकरच होण्याची शक्यता आहे. विमानतळाच्या कामकाजास गेल्या तीन महिन्यांपासून चांगलीच गती मिळालेली आहे. धावपट्टीचा नकाशा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा नकाशा एएआयकडून (एअरपोर्ट अँथारिटी ऑफ इंडिया) अंतिम केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी 29 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन विमानतळाची कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. संपादित जमिनीवरील पाझर तलावाचे हस्तांतरण सुरू आहे. धावपट्टीचा नकाशा तयार करण्यात येत आहे. त्याचा काही भाग वनविभागाच्या जमिनीवर येतो. त्यामुळे वनविभागाची नेमकी किती जमीन यामध्ये जाणार हे स्पष्ट झालेले नाही.