आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून आंबेडकरवादी साहित्यजागर, आमदार प्रणिती शिंदेंच्‍या हस्‍ते उद्घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अजिंक्य कल्चरल अकॅडमीतर्फे शनिवार रविवारी (दि. १४ १५) १३ वे अखिल भारतीय अांबेडकरवादी साहित्य संमेलन होईल. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार असतील. हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणा-या संमेलनाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होईल.
यात प्रख्यात साहित्यिक, विचारवंत, कवी सहभागी होत आहेत, अशी माहिती निमंत्रक शांतीकुमार कांबळे, कार्याध्यक्ष बाबूराव बनसोडे, स्वागताध्यक्ष नगरसेवक अविनाश बनसोडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला डाॅ. धम्मपाल माशाळकर, बाबूराव बनसोडे, मीनाक्षी गायकवाड, सुजाता फडतरे आदी उपस्थित होते. शनिवारी सकाळी १० वाजता आंबेडकर उद्यान येथून जनजागृती रॅली निघेल. सकाळी ११ वाजता समता सैनिक दलाची डॉ. आंबेडकर पुतळ्यास मानवंदना संकल्प गीत गायन होईल. रविवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमानंतर मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
दिवस पहिला - शनिवार
दुपारी 3 ते 5 : परिसंवाद : भारतीयलोकशाही क्रांती जातीअंताशिवाय शक्य नाही सहभाग: अध्यक्षडॉ. भारत पाटणकर, रामराव गवळी, प्रा. तानाजी ठोंबरे, प्रा. एम. आर. कांबळे
सायंकाळी: बीजभाषण : डॉ.आंबेडकर, संविधान आणि मानव अधिकार वक्ते: अॅड.अरविंद माने
सायं.5 ते 6 : सांस्कृितक कार्यक्रम :एकपात्री - मी रमाई बोलतेय
भीमगीत गायन : श्रद्धासनमाडीकर, संदीप शिंदे, प्रा. शंकर खळसोडे पंकज शिंदे
दिवस दुसरा - रविवार
सकाळी १० ते १२ : संवाद :
{डॉ.आंबेडकरांची स्त्रीविषयक भूमिका, आंबेडकरी चळवळीत शाहीर वामन कर्डकांचे योगदान आदी विषयांवर मान्यवरांचा संवाद.

दुपारी १२ ते 2 : कविसंमेलन
दुपारी 2 ते 4 : परिसंवाद : सावधान,फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे मारेकरी येत आहेत सहभाग: मनीषातोकले, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे आदी.
दुपारी 4 ते 5 : प्रकट मुलाखत : अॅड.एकनाथ आव्हाड यांची मुलाखत