आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आलमट्टी धरणाचे पाणी मिळेल असे वाटत नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूरला आलमट्टीतून पाणी सोडावे, यासाठी पाणी पुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली तरी याबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे मला वाटत नाही. कर्नाटक सरकार पाणी देईल याबद्दल मी साशंक आहे. यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

येथील शासकीय विर्शामगृहात उपमुख्यमंत्री पवार यांनी दुष्काळ आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना र्शी. पवार म्हणाले, सोलापूरला आलमट्टी धरणातून दोन टप्प्यांत 1.2 टीएमसी पाणी मिळावे म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. कर्नाटकातून पाणी मिळेल याची साशंकता आहे. पण ते मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न चालूच राहतील, असेही त्यांनी सांगितले.

कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी हवी राज्यपालांची मंजुरी
राज्यात दुष्काळ पडला आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी राज्यपालांची मंजुरीची गरज आहे. मंजुरीसाठी विलंब लागेल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कामांचा अग्रक्रम ठरवलेला आहे. विलंब लागतील, अशी कामे नंतर करण्यात येणार आहेत.

सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार
सोलापूर शहराशी निगडित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी माझे प्रयत्न चालूच असतील. सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन बैठक घ्यावी. कुठे अडचण असेल तर माझी मदत घ्या. सोलापूरच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेऊ, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

साखर कारखानदारांना विनंती
राज्यात सर्वाधिक उसाचे क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यासाठी जिल्ह्यात जलसंधारणाची कामे झाली पाहिजेत. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करावे. नाले, सिमेंट बंधारे, कारखान्यातील मशिनरी प्रशासनास उपलब्ध करून द्याव्यात. जेणेकरून दुष्काळाशी लढता येईल.