आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan In Pandharpur

पंढरीत शनिवारपासून नाट्यसंमेलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - शनिवारपासून पंढरीत सुरू होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होईल. नाट्यसंमेलनाचे मावळते अध्यक्ष मोहन आगाशे यांची प्रमुख राहील, तर नियोजित अध्यक्ष अरुण काकडे यांच्या अध्यक्षस्थानी असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री नारायण राणे, बांधकाममंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल आदींची प्रमुख उपस्थित राहणार आहे.

संमेलनाचा समारोप रविवारी (ता. 2) नाट्य परिषदेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष तथा कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. या वेळी प्रमुख पाहुणे जलसंपदामंत्री सुनील तटकरे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे उपस्थित राहणार आहेत.