आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी नाटकांच्या बसला नको टोल, संमेलनात ठराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- मराठी रंगभूमी सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. त्यामुळे शासनाने मराठी नाटकांच्या बसला टोलमुक्त करावे, असा ठराव 94 व्या नाट्य संमेलनात झाला. पंढरीत झालेल्या या संमेलनात रविवारी खुले अधिवेशन झाले. त्यात 16 ठराव मंजूर करण्यात आले.


नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झाले. पहिल्यांदा दिवंगतांना शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर रंगकर्मींच्या अभिनंदनाचा ठराव झाला. इतर ठराव असे होते.