आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महावितरण’चा मनपाला शॉक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेला महावितरण कंपनीने पथदिव्यांच्या बिलापोटी महाशॉक दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महावितरण अतिरिक्त देयक पाठवत असल्याने मनपा अधिकार्‍यांची झोप उडाली आहे. या प्रकरणात महावितरण कंपनीने मनपाच्या पथदिव्यांसाठीच्या मीटरचे फोटो का घेतले नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. देयक,रीडिंगमध्ये दोन लाख 46 हजार 996 युनिटचा फरक आहे. हा बारा लाख रुपयांचा अतिरिक्त फटका मनपाला बसला आहे.
मनपाच्या पथदिव्यांपोटी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त देयक आले. हे देयक आल्यानंतर नोव्हेंबरमध्य अतिरिक्त देयक आल्याने मनपाला झटका बसला. सरासरी देयकांपेक्षा अधिकचे देयक आल्याने अधिकार्‍यांचे डोळे पांढरे झाले. मनपाने महावितरणला देयक कमी करण्याची मागणी केली आहे. मनपा पथदिव्यांपोटी ऑगस्ट 2013 पर्यंत महिन्याला तीन लाखांचे देयक येत होते. त्यानंतर सप्टेंबर 2013 मध्ये हे पाच लाखांचे देयक आले. ऑगस्टमध्ये महावितरणने पथदिव्यांचे आठ मीटरच्या देयकांमध्ये दहा हजार युनिटच्यावर वापर दाखवून नऊ लाखांचे देयक दिले. नोव्हेंबरच्या दहा मीटरच्या देयकांमध्ये साडेअकरा लाखांचे देयक दिले. दरम्यान, मीटर व देयकातील रीडिंगमध्ये तफावत असून, ती दोन लाख 46 हजार 996 युनिट एवढी आहे.
अतिरिक्त देयकाची सूचना महावितरणच्या अधिकार्‍यांना दिली. हे देयक कमी करण्याची मागणी केली. अडीच लाखांपेक्षा अधिकचे देयक आले. या देयकांवर मीटरचा फोटो नाही, वीज वापर पाहता आलेले देयक अधिक आहे.’’ अमोल डोईफोडे, विद्युत विभाग प्रमुख, मनपा.