आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation Failed To Provide Drinking Water Twice A Week

आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठय़ाचे आश्वासन हवेतच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सत्तारूढ भारिप-बमसंच्या आंदोलनात प्रमुख विषय असलेला पाणीपुरवठय़ाचा विषय मागे पडला आहे. सत्तारूढ पक्षाला दिलेल्या आश्वासनांचा विसर महापालिकेचे अभियंता आणि कर्मचार्‍यांना पडला आहे. महासभेत महापालिका अभियंत्यांनी 22 सप्टेंबरपासून आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन हवेत विरले असून, सत्तारूढ भारिप-बमसंनेदेखील गेल्या चार दिवसांत या विषयावर कुठलेही निवेदन प्रशासनाला दिले नाही तसेच या विषयाचा पाठपुरावा केल्याचे चित्र नाही.

गेल्या महासभेत महापालिका अभियंत्यांनी 22 सप्टेंबरपासून मनपा आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करेल, असे आश्वासन दिले होते. तत्कालीन महापालिका आयुक्त दीपक चौधरी यांना सत्तारूढ भारिप-बमसंच्या नगरसेवकांनी घेराव घातला होता. त्यानंतर मनपासमोर महापौरांच्या नेतृत्त्वात दिलेल्या ठिय्या आंदोलनात या विषयाची मागणी सत्तारूढ भारिप-बमसंने केली होती. याविषयी रणकंदन करणारे भारिपचे नेते गेल्या चार दिवसांपासून गप्प का, असा प्रश्न नागरिकांद्वारे विचारला जात आहे. आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन महासभेत पालिका अभियंत्यांनी दिले होते. त्याची पूर्तता झाली नसल्याने त्यांच्यावर महासभा काय कारवाई करणार, असा मुद्दा आता नागरिकांद्वारे विचारला जात आहे. महान धरणात पुरेसा पाणीसाठा असताना आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या या मागणीची पूर्तीता केव्हा होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.