आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशवाणी जमीन प्रकरण: हायकोर्टाचा निर्णय, जिल्हाधिकारी यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या जमीन मोबदला प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, सोलापूर आकाशवाणीचे अधिकारी गजानन सुरवसे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन अवमान याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. न्यायमूर्ती व्ही. ए. नाईक सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
काय आहे प्रकरण...
माजीआमदार गुरुनाथ पाटील यांनी आॅक्टोबर १९८१ मध्ये गट क्रमांक २१९ मधील एकर (२४ हजार ३०० चौ.मी.) जमीन विनामोबदला आकाशवाणी केंद्रासाठी दान दिली. स्थानिक वृत्तपत्रात तशी जाहिरातही दिली. मात्र माजी आमदार गुरुनाथ पाटील यांनी ऑक्टोबर १९८७ रोजी जमीन परत मागितली. शासनाने ते अमान्य केल्याने हे मूळ प्रकरण न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे.

भूसंपादनाचे काम सुरू होते
आकाशवाणीजमीनप्रकरणातील सत्य माहिती न्यायालयासमोर आलीच नव्हती. गुरुनाथ पाटील यांचे पूत्र अर्जदार सिद्धाराम पाटील यांनी शासनविरोधात २०१० साली याचिका दाखल केली. यामध्ये आकाशवाणी केंद्रास दिलेली जमीन परत मिळावी किंवा संपादन केल्यापोटी त्याचा मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी होती. न्यायालयाने जमीन संपादन करण्याचे आदेशही दिले, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीची कार्यवाही झाल्याने अर्जदार सिद्धाराम पाटील यांनी याचिका दाखल केली. न्यायालयाने पाटील यांना कोटी ६३ लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश सरकारला दिले. यावर जिल्हािधकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली.

गेडामयांनी कोर्टासमोर आणले सत्य...
दरम्यान,याच कालावधीत जिल्हाधिकारी म्हणून प्रवीण गेडाम रूजू झाले होते. पैसे देण्यासंदर्भात प्रक्रिया चालू असतानाच सदर जमीन दान म्हणून दिली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाटील यांना पैसे देण्यास हरकत घेतली. पैसे मिळाल्याने अर्जदार पाटील यांनी दोन अवमान याचिका दाखल केल्या. तोपर्यंत गेडाम यांनी सत्य न्यायालयासमोर आणले.