आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Muslim Backward Classes Organization Demand To Chief Minister

500 कोटींचा निधी आणि जमीनीची मख्‍यमंत्र्यांकडे मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुस्लिम गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन उपलब्ध करून द्या, कमी व्याजदरात कर्जपुरवठा करा, मौलाना आझाद महामंडळास 500 कोटी रुपयांचा निधी द्या, अशा मागण्या मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनने केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अल्पसंख्याक मंत्री आरिफ नसीम खान, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, मुंबई प्रदेश अध्यक्ष गजानन चांदूरकर, संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार हसन कमाल, प्रदेश संघटक हसीब नदाफ, सरचिटणीस इम्तियाज शेख, उपाध्यक्ष जरारअहमद बागवान, सोलापूर शहर अध्यक्ष सलीम नदाफ, अशोक पिंडारी आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या

  • 1. केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनात 15 टक्के हिस्सा अल्पसंख्याकांना द्यावा
  • 2. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मुस्लिम ओबीसींची यादी करून त्यांना उपकोटा द्यावा
  • 3. गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती दरवर्षी देण्यात यावी.
  • 4. जिल्हा पातळीवर आर्शमशाळा, वसतिगृहांची सोय करावी. अधिक सुविधा द्याव्यात
  • 5. जातसदृश आडनावे असणार्‍या जमातींना व्यवसाय पुरावे न मागता दाखले द्यावेत
  • 6. हज यात्रेकरूंसाठी केंद्राकडून घेतला जाणारा सेवाकर त्वरित रद्द करावा.


मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनच्या पदाधिकार्‍यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत बैठक झाली. तीत हसीब नदाफ, इम्तियाज शेख, जरारअहमद बागवान, सलीम नदाफ.

परिपत्रक काढू
कब्रस्तान, ईदगाहसाठी शहर विकास आराखड्यात जागा राखीव करण्याबाबत परिपत्रक काढू. 15 कलमी कार्यक्रमांची कृतिशील अंबलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची बैठक घेऊ.’’ पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री