आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी आता तपासणार पॅसेंजर गाड्या; फुकट्यांना आळा घालण्यासाठी सोलापूर प्रशासनाची शक्कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर | सोलापूररेल्वे विभागातून सुटणाऱ्या काही पॅसेंजर गाड्यामधून विनातिकीट, अनधिकृत विक्रेते तृतीयपंथी प्रवास करतात. अशांचा तिकीटधारी प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. तो रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामास लावले आहे. केवळ आपॅरेटिंग विभाग वगळता अन्य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी तपासणार आहेत.

पॅसेंजर गाड्यांना तिकीट निरीक्षक नसतात, अशी ओरड प्रवाशांकडून करण्यात येते. याची चांगलीच दखल सोलापूरच्या रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. वाणिज्य विभागाकडून यासाठी एक अभिनव प्रयोग राबवण्यात येत आहे. रेल्वेच्या एकूण १० विभागांपैकी केवळ ऑपरेटिंग विभाग वगळता उर्वरित सर्वच म्हणजे कार्मिक, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, सिंग्नलिंग आदी विभागांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पॅसेंजर गाडी तपासण्याचे आदेश विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांनी दिले आहेत.
वाणिज्य विभागाने त्याचे वेळापत्रक तयार केले आहे. त्या संबंधित अधिकाऱ्यांना पॅसेंजर गाड्या वाटून देण्यात आल्या आहेत. त्या प्रमाणे ते अधिकारी तिकीट पर्यवेक्षकांना सोबत घेऊन पॅसेंजर गाड्या चेक करित आहेत. तसेच गाडीत अनधिकृत विक्रेत्यांची तपासणी करित आहे. सोलापूर स्थानकावरून सुटणाऱ्या फलकनामा, रायचूर, विजापूर, पुणे आदी पॅसेंजरची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांना काही प्रमाणात आळा बसत आहे. तसेच रेल्वेच्या चालू तिकिटांची विक्री वाढत असून उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.

फुकट्या प्रवाशांना आळा बसावा म्हणून हा प्रयोग राबवण्यात येत आहे. २१ नोव्हेबरपर्यंत पॅसेंजर गाड्या अधिकाऱ्यांकडून चेक करण्यात येत आहेत. त्यानंतर पॅसेंजर गाड्या चेक करण्याचे काम सुरू राहणार आहे.” नर्मदेश्व रझा, वरिष्ठविभागीय वाणिज्य व्यवस्थापक