आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Things Discussed In District Planning Meeting

मोहितेंच्यानंतर पहिल्यांदाच सर्वांगीण विकासाची चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सचिव यांची पहिलीच बैठक असल्याने रूळलेल्या सदस्यांचे समाधान होणार का, याविषयी साशंकता होती. मात्र, अध्यक्ष तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सचिव जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी चार तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या बैठकीत सर्वच सदस्यांच्या आक्रमक प्रश्नांना तेवढ्याच शांतपणे समाधानकारक उत्तरे देत बैठक यशस्वी केली. तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते यांच्या कारकिर्दीनंतर सर्व विषयांवर चर्चा झालेली ही बैठक म्हणता येईल.

गणपतरावदेशमुख आक्रमक : निधीखर्चावर आमदार गणपतराव देशमुख प्रथमच आक्रमक झाल्याचे दिसून आले. समाजकल्याण आयुक्त मनीषा फुले यांनी अधिका-यांनी खर्च झालेल्या निधीची वेळेवर माहिती दिली नसल्याचे बैठकीत सांगितले. यावर देशमुख यांनी पालकमंत्र्यांना थेट प्रश्न करत बैठकीत निधी खर्चाची खालच्या अधिका-यांकडून माहिती येत नसेल तर चुकीचे आहे. सभागृह वरिष्ठांना वेळेत बिनचूक माहिती देता येत नसेल तर बैठकीत चर्चा कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केला.

यांच्यावरहोणार कारवाई : खर्चाचीमाहिती वेळेत सादर केल्याबद्दल आमदार गणपतराव देशमुख यांनी सभागृहाला धारेवर धरले. यावर जिल्हाधिकारी मुंढे यांनी माहिती देणा-या अधिका-यांना नोटिसा द्या, खुलासा समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामध्ये पशुसंवर्धन अधिकारी यांनी उशिरा माहिती दिल्याचे सांगण्यात आले, तर मनीषा फुले यांनीही आदिवासी विकास उपयोजनांवर झालेल्या खर्चाची आकडेवारी चुकीची दिल्याचे निदर्शनाला आले. यामुळे या दोन अधिका-यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

आमदार शिंदेंनी हिसकावला माइक
जिल्हापरिषद सदस्य सुरेश हसापुरे प्रश्न मांडत असताना मोहोळचे आमदार रमेश कदम यांनी हसापुरे यांच्या हातातून माइक हिसकावून प्रश्न मांडला. यावेळी हसापुरे यांनी चिडून तुम्ही विधानसभेत प्रश्न मांडा, इथे नाही, असे सांगत तुम्ही आमच्या हक्कावर गदा आणत असल्याचेही बोल आमदार कदम यांना सुनावले.
डीपीसीची बैठक घेताना पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे.

आमदार रमेश कदम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर जिल्हाधिकारी मुंढे यांनी संबंधितांना उत्तरे देण्यास सांगितले तर एका प्रश्नावर खुद्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी संबंधित कर्मचारी अधिकारी यांची चौकशी करणार असल्याचे सांगितले. गारपीटची नुकसानभरपाई वाटपवर निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी उत्तर देत पुन्हा पंचनामे करणे शक्य नसून शिल्लक निधीतून घरांची पडझड झालेल्या नागरिकांना निधी देता येईल का, यासंबंधी प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड यांनी संगदरी येथील औद्योगिक वसाहत, बोरामणी विमानतळ, पाझर तलाव, तांडा सुधार योजना याविषयी तर सुरेश हसापुरे यांनी सौर ऊर्जा, लघु पाटबंधारे, स्मशानभूमीसाठी जागा याविषयी प्रश्न उपस्थित केले. यावर जिल्हाधिकारी मुंढे यांनी पाठपुरावा सुरू आहे. यासंबंधी संबंधितांना पत्र दिल्याचे सांगितले, तर सिमेंट बंधारे यासाठी थेट शासनाकडून निधी मिळत असल्याने तरतूद कमी केल्याचे सांगितले.

आमदार बबनराव शिंदे यांनी सीना-भीमा नदीवरील बंधारे तुटल्याने पाणी थांबत नाही, तत्काळ नवीन बंधारे बसवण्याची मागणी केली. यावर नावीन्यपूर्ण योजनेमध्ये नवीन कामांना निधी देता येतो, जुन्या दुरुस्तीच्या कामांना देता येत नाही. पुणे जिल्ह्याने कशा प्रकारे निधी दिला आहे, याची माहिती घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले. बंधारे दुरुस्तीसाठी शासनाकडे २२ कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी सांगितले.