आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आलमट्टीच्या पाण्यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘आलमट्टी’तील पाणी सोलापूरला आणण्यासाठी सर्वोच्च स्तरावरून आणि निवडणूक आयोगाशी चर्चा करून प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोलापूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दुष्काळामुळे उन्हाळ्याची सुटी शासकीय अधिकारी घेणार नाहीत. प्रशासनातील अधिकारी कायम तत्पर असतील. वेळोवेळी आढावा घेण्यासाठी व्हीसीव्दारे त्यांच्याकडून माहिती घेऊ. उद्या रविवारी रंगपंचमी असल्याने रंगही कोरडा खेळा.

पाण्याचा अपव्यय टाळल्यामुळे नागरिकांना धन्यवाद द्यायला पाहिजे. सहकार विभागातर्फे पाणी साठवण्यासाठी साडेबाराशे सिंटेक्स टाक्या सोलापूरकरिता दिले आहेत. आणखी टाक्यांसाठी सहकारी बँक, खासगी बँकांची मदत घेऊन ती दिली जाईल, असे श्री. चव्हाण म्हणाले.