आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्‍ये अँलोपॅथीच्या परवानगीचे स्वागत आणि विरोधही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना अँलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची काही अटीवर परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या स्वागताबरोबरच विरोधही होत आहे. होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे सिनिअर डॉक्टरांनीच याला विरोध केला, तर दुसरीकडे या निर्णयाच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी राज्यभर निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज काळया फिती लावून काम करणार
होमिओपॅथी डॉक्टरांना अँलीओपॅथी प्रॅक्टीस करण्यास परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. पुणे आणि मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. सोलापुरात सर्व डॉक्टर शुक्रवारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. राज्याचे अध्यक्ष दिलीप सारडा यांनी तसा निर्णय सर्व शाखांना कळविला आहे, अशी माहिती सोलापूरचे अध्यक्ष डॉ. सुनील वैद्य यांनी दिली.

निर्णयाचे स्वागत,ग्रामीण रुग्णांना दिलासा
राज्य सरकारने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांना ग्रामीण भागात काम करण्याची संधी दिल्याने गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना कमी खर्चात चांगली वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे. या निमित्ताने शासनाचा वैद्यकीय सेवेचा उद्देश पूर्ण होण्यास मदत मिळेल. या निर्णयाचे स्वागत करतो. डॉ. विलास हरपाळे, प्राचार्य, महिला होमिओपॅथिक कॉलेज

दूरगामी परिणाम होईल
शासनाचा निर्णयच चुकीचा आहे. आता हा निर्णय जरी ग्रामीण भागापुरता र्मयादित असला तरी या निर्णयाचे दूरगामी परिणाम वैद्यकीय क्षेत्रात होऊ शकतात. आज होमियोपॅथी डॉक्टरांना परवानगी दिली, उद्या आयुर्वेदाचीही परवानगी मागतील. होमिओपॅथीमध्ये तसे होत नाही. या संदर्भात अलहाबाद उच्च् न्यायालयात होमिओपॅथिक डॉक्टरांनी याचिका दाखल केली होती. पण ती फेटाळली गेली. त्यावेळीही न्यायालयाने अँलीओपॅथी प्रॅक्टीस करणे तेवढे शक्य नाही, कारण घटनेतील कलम 21 नुसार नागरिकांना रोगाचे योग्य निदान करण्याचा हक्क आहे, त्यावर गदा येऊ शकते. डॉ. सुनील वैद्य (अध्यक्ष, आयएमए)

होमिओपॅथी धोक्यात येण्याची शक्यता
होमिओपॅथी आणि अँलोपॅथी या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. दोन्हींचा पाया वेगळा आहे. त्या एकत्र केल्यास होमिओपॅथी धोक्यात येईल. दोन्ही उपचारशास्त्र वेगवेगळ्या तत्त्वांवर आधारलेले आहे. होमिओपॅथी वाढीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. नाही तरी असे विद्यार्थी अँलोपॅथीचा आधार घेतच असतात. ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग. तेथील बहुतांश डॉक्टर अँलोपॅथी उपचार पद्धतीच वापरत असतात. या दोन्ही गोष्टी भिन्न ठेवून, त्या वाढीस लागणे याबाबत शासनाने विचार करावा. डॉ. हिरालाल अग्रवाल, होमिओपॅथी तज्ज्ञ

चुकीच्या धोरणामुळे निर्णय दुर्दैवी ठरेल
होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अँलोपॅथी प्रॅक्टिस परवानगी देण्याचा निणय दुर्दैवी असेल. साडेचार वर्षांच्या कालावधीत पूर्ण केलेला अभ्यासक्रम केवळ एक वर्षात पूर्ण कसा होऊ शकेल? मुळात युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथी असे अभ्यासक्रमातील 52 हजार विद्यार्थी दरवर्षी डिग्री घेतात. तर अँलोपॅथीचे 4500 इतकेच असतात.त्यासाठी अँलोपॅथी अभ्यासक्रमातील प्रवेश क्षमता वाढवावी. त्याऐवजी इतर पॅथीतील डॉक्टरांना अशी परवागनी देणे हा अयोग्य मार्ग ठरेल. डॉ. राहुल थोरात, मार्ड अध्यक्ष