आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लूटणार्‍या अँम्ब्युलन्सना धोक्याचे ‘सायरन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जीवनमरणाच्या प्रसंगी रुग्णांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून नातेवाईक पाहिजे तेवढे पैसे मोजण्यास तयार असतात. नेमकी याच स्थितीचा गैरफायदा काही अँम्बुलन्सचे चालक घेतात. दरापेक्षा जास्त किंवा अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी करतात. मात्र, 1 सप्टेंबरपासून या प्रकारांना चाप बसणार आहे. कारण राज्य सरकारने याचे दर निश्चित केले आहेत. त्यापेक्षा अधिक रकमेची मागणी केल्यास कडक कारवाईचे संकेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले आहेत.

सोलापुरात 1 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. अँम्ब्युलन्सची सेवा खासगी असो अथवा सरकारी रुग्णालयाची त्या सर्वांना हा नियम लागू आहे. आरटीओकडे शहर व जिल्ह्यातील 212 अँम्ब्युलन्सची नोंद आहे.

दरपत्रक रंगवणे बंधनकारक
रुग्णवाहिकेवर दराची पाटी आतून व बाहेरून रंगवणे बंधनकारक आहे. ती सहज दिसली पाहिजे. दरपत्रक चिटकवून चालणार नाही. ते रंगवणेच सक्तीचे आहे. त्याच्याशी कुठल्याच प्रकारे छेडछाड करता येणार नाही. ते पाहूनच रुग्णवाहिकेस संमती देण्यात येईल.

असे असतील दर
दरपत्रक जारी
रुग्णवाहिकेचे प्रकार 20 किमी / प्रति
दोन तास किमी
मारुती व्हॅन- 200
टाटा सुमो, मॅटोडोअर- 250
टाटा 407 स्वराज्य -300
वातानुकूलित वाहन -500

.. तर दंड होईल
परिवहन प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापुरातील सर्वच रुग्णवाहिकांना तो लागू असणार आहे. जास्त पैसे काढणार्‍या रुग्णवाहिकेवर कारवाई करण्यात येईल.
- दीपक पाटील, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर