आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी डेव्हिड करतात शिवपुरीचे अग्निहोत्र, 23 वर्षांपासून भारतीय उपासनेच्या प्रेमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपुरी(अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील अग्निहोत्र उपासनेचे महत्त्व जगभरात पटले आहे. मूळ अमेरिकी डेव्हिड फील्ड २३ वर्षांपासून नित्यनेमाने ही साधना करतात. आरोग्य, आनंद आणि अात्मिक शक्ती देणाऱ्या या साध्या सोप्या पद्धतीमुळे जीवनात सकारात्मक बदल झाल्याचा दावाही डेव्हिड करतात.
ऑरेगॉन प्रांतात पोर्टलँडचे रहिवासी डेव्हिड यांची भारतीय संस्कृती आणि आध्यात्मावर अपार श्रद्धा आहे. वर्षा-दाेन वर्षाला ते भारत भेटीवर येतात. सध्या महिनाभरापासून त्यांचा मुक्काम शिवपुरीत आहे. ६२ वर्षांचे डेव्हिड व्यावसायिक असून पोर्टलँड शहरात त्यांचे रेस्टॉरंट आहे. अमेरिकेसह कॅनडा, फ्रान्स आदी देशांत त्यांच्या या व्यवसायाचे जाळे आहे. यानिमित्त ते खूप देश फिरले. यात भारतीय जीवनपद्धतीत असलेली सात्त्विकता त्यांना भावली. १९९०-९१ दरम्यान पोर्टलँडमध्ये अग्निहोत्र शिबिरात डेव्हिड यांच्या पत्नी सहभागी झाल्या. त्यांनी ही माहिती डेव्हिड यांना दिली. अगदी सहज आणि ही साधी-सोपी उपासना त्यांच्या कुटुंबाने सुरू केली.
भारताविषयी काय वाटते?
भारतीयसंस्कृती, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यावर डेव्हिड श्रद्धेने बोलतात. भारतीय अहिंसेचे विचार, विश्वकुटुंबकमची संकल्पना, सहिष्णुता, औदार्य माणुसकी जपणारे असून यामुळे जागतिक शांतता निर्माण होईल, असा त्यांना विश्वास आहे.
साधनेची प्राचीन पद्धत अग्निहोत्रही भारतातील साधनेची प्राचीन पद्धती आहे.आरोग्य, वातावरणशुद्धी आणि आत्मिक शांतीसाठी यज्ञ, तप, दान, ज्ञान आणि स्वाध्याय या पंचतत्त्वांवर आधारित ही पवित्र जीवनपद्धती आहे.