आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भामट्या अमित झेंडेवर दाखल आहेत तीस गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ट्रेझरी शाखा, कृषी खात्यात काम करतोय, ग्रामसेवक आहे, पेन्शनचे पैसे आले आहेत अशा थापा मारून नागरिकांना गंडविणारा अट्टल भामटा अमित रामा झेंडे (रा. उस्मानाबाद) याच्यावर तब्बल तीस गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
झेंडेला शनिवारी एका गुन्ह्यात तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सोलापुरातील पंधरा गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले
असून त्याची सुनावणी सुरू होणार आहे.

झेंडे हा सोलापुरातील सातरस्ता परिसरातील एका हॉटेलात राहायचा. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना हेरून थापा मारूत पैसे उकळायचा. दीड वर्षापूर्वी तो सदर बझार पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्यानंतर विजापूर नाका, सदर बझार, फौजदार चावडी, जोडभावी पोलिसांत तब्बल सोळा गुन्हे दाखल झाले. नागरिकांनी फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती वाढत गेली.
न्यायालयीन कोठडीत असताना झेंडे एकदा पळाला होता
पोलिसांनी झेंडेला अटक केल्यानंतर तो न्यायालयीन कोठीत असताना शासकीय रुग्णालयात उपचाराला दाखल झाला होता. त्यावेळी पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. त्यानंतर लातूरमध्ये फसवणूक करताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला पुन्हा सोलापुरात आणले. अटकेनंतर जामीन मिळाल्यानंतर दोन गुन्हे त्याने केले. एका बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्यानंतर त्याला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 जानेवारी 2014 रोजी अटक केली. तेव्हापासून तो कारागृहातच होता. सोलापुरातील पंधरा गुन्ह्यांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनीही यात लक्ष घातल्यामुळे पोलिसांनी सक्षमपणे कारवाई करून झेंडेला अटक केली होती.