आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेची साहस उडी, विमानातून 14 हजार फुटांवरून स्कायडायव्हिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गिर्यारोहणासाठीसध्या ऑस्ट्रेलिया खंडात असलेल्या भारताच्या एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने नुकतेच सिडनीच्या आकाशातून १४ हजार फूट उंचीवरून विमानातून उडी मारून एक आगळावेगळा विक्रम केला.
बनसोडेसमवेत तीन जोडपी शरद अंजली कुलकर्णी, श्रीकांत रुपाली चव्हाण आणि दिनेश तारकेश्वरी राठोड यांनी तसेच साची सोनी, मनीषा वाघमारेही होत्या. ही फॉर शी मिशन अर्थपूर्ण बनवत आम्ही सर्व काही करू शकतो, हे दाखवून दिले. बनसोडे याने ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च १० शिखरे नुकतीच सर केली.
वर्ल्ड पीस-सेव्हन समिट मोहिमेअंतर्गत ऑस्ट्रेलियामधील ऑसी १० शिखराचे आव्हान बनसोडेसह आठ जणांनी पूर्ण केले. हे शिखर सर करणारी पहिली भारतीय टीम असा मान मिळाला. यात आनंदसह कुलकर्णी, चव्हाण दांम्पत्य, दिनेश राठोड तारकेश्वरी भालेराव ही जोडपी आकाश, संजना, मनीषा, साची याही सहभागी होत्या.
सातशिखरांची मोहीम
माउंटएव्हरेस्ट (१९ मे २०१२), माउंट एल्ब्रूस (१७ जुलै २०१४) माउंट किलीमांजारो (१५ ऑगस्ट २०१४) माउंट कोसिस्को (२ नोव्हेंबर २०१४) ही चार खंडातील चार सर्वोच्च शिखरे सर. आनंद आता पुढे दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणार आहे.
महाराष्टपोलिस जवान
सुरेंद्रशेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलिस दलातील दिनेश राठोड तारकेश्वरी वाघमारे यांनी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखरे सर केली असून असे करणारे ते महाराष्ट्रातील प्रथम पोलिस ठरले आहेत. राठोड मूळचे मंद्रूपचे आहेत.
स्काय डायव्हिंग म्हणजे
उडत्याविमानातून उडी मारून कसरती करणे यास स्काय डायव्हिंग म्हणतात. ऑस्ट्रेलियातील मित्र गाइड रॉब याच्या मदतीने आनंदने या साहसाची आखणी केली गेली. १४ हजार फुटांवरून ताशी सुमारे २०० किमी वेगाने खाली येत पक्ष्याप्रमाणे आकाशात विहार करण्याचा चित्तथरारक अनुभव घेतला.
अमेरिकेतील प्रशांत महासागरात स्कूबा डायव्हिंग केले. बर्फाचे पर्वत चढलो. पण, हे हवेतील साहस मला खूप आनंद देऊन गेले. पृथ्वीला इतक्या वरून पाहताना खूप विस्मयकारक वाटले.” आनंदबनसोडे, एव्हरेस्टवीर,सिडनी, ऑस्ट्रेलिया एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने सिडनी येथे स्काय डायव्हिंग केले.