आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anjali Damania News In Marathi, AAP, Osamanabad Lok Sabha Constituncy

देशातील घराणेशाही संपवा - अंजली दमानिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी - ‘प्रस्थापितांसाठी पर्याय म्हणून ‘आप’ची निर्मिती झाली आहे. देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. प्रस्थापित व विरोधकांची घराणेशाही आहे. तो संपायला हवा. सामान्यातून नेता निर्माण व्हायला हवा. त्यासाठी आम आदमी पक्षाला साथ द्या,’ असे आवाहन ‘आप’च्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी केले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रा. अशोक सावळे यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.


दमानिया म्हणाल्या, ‘विरोधकांकडून प्रांतवाद, जातीयवाद पसरवला जात आहे. आपण सर्व एक असून, भारताचे नागरिक आहोत, हे विसरता कामा नये. आम आदमी पक्ष हा पक्ष नाही तर एक आंदोलन आहे. प्रस्थापितांचा भ्रष्टाचार पाहून हा देश कधी बदलणार? असा प्रश्‍न पडतो. महिलांमध्येही त्यांच्याविषयी संताप आहे. विरोधकांकडून मतदारसंघाची वाताहत झाली आहे, याचा विचार करायला हवा. देशसेवा हा शब्द आपण विसरतो आहोत. तसेच आम्ही देशवासीयांचा विचार बदलण्याचे काम करू.’ विद्या सावळे यांनी स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. या वेळी ‘आप’चे जिल्हा संयोजक केरबा गाढवे, प्रा. मारुती पारकर, उस्मान तांबोळी, भगरे गुरुजी आदी उपस्थित होते.


सर्वांना निवडून दिले, तुमच्या वाट्याला काय?
1956 ते 2014 या काळात आपण वेगवेगळय़ा पक्षाचे खासदार निवडून दिले. परंतु तुमच्या वाट्याला काय आले, असा सवाल उमेदवार प्रा. विक्रम सावळे यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पार्टी -शिवसेना यांना या मतदारसंघात संधी मिळाली. दोघेही अकार्यक्षम असल्याने मतदारसंघ भकासच राहिला. भ्रष्टाचारी सत्ताधारी व अकार्यक्षम विरोधक यामुळे विकास झाला नाही. पुन्हा ती चूक करू नका. ही परिस्थिती बदलण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.