आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare Talks On Drought And Political Issues

आत्मक्लेषासाठी आत्मा साफ हवा : अण्णा हजारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आत्मक्लेष करायला आत्मा तेवढा साफ पाहिजे, असे म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरूवारी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. ज्यांचा आत्माच साफ नाही त्यांनी आत्मक्लेष करून काय फायदा ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दुष्काळाबाबत हजारे म्हणाले, हा दुष्काळ मानव निर्मित आहे. जलपुनर्भरण न करता मोठमोठ्या धरणांवर लक्ष दिले जात आहे, ते काय कामाचे ?


दुष्काळी परिस्थितीतही आयपीएल सामने भरविले जातात, याबाबत बोलताना ते म्हणाले, सामने पहायला आमचेच लोक जातात नं, त्यांनीच बहिष्कार टाकला तर कोण पहायला जाईल, लोकांनीच हे ठरविले पाहिजे.