आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anti Toll Agitation News In Marathi, State Road Transport, Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटीवरील ‘टोलधाड’ आता कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एरवी कोणत्याही राजकीय पक्षांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका एसटी गाड्यांना बसतो. मात्र, सध्या राज्य मार्ग परिवहनला एका आंदोलनामुळे फायदा झाला आहे. तेही ‘खळ्ळ खट्याक’ची भाषा करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे. या आंदोलनामुळे राज्य सरकारला राज्यातील 22 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे महामंडळाचा दरवर्षी किमान 14 ते 15 कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. आर्थिक कचाट्यात सापडलेल्या एसटी प्रशासनाला हा निर्णय दिलासा देणारा आहे.


राज्यात एकूण 225 टोलनाक्यांवर एसटीला कर द्यावा लागतो. 2013 वर्षात त्यासाठी एसटीला 127 कोटी रुपये मोजावे लागले. एकूण टोलनाक्यांपैकी जवळपास 22 टोलनाके हे 10 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या रस्त्यावर उभारण्यात आले आहेत. हे सर्व 22 टोलनाके राज्य सरकार बंद करणार आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील चार टोल नाक्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या मार्गावरून धावणार्‍या गाड्यांना आता टोल द्यावा लागणार नाही. त्या मार्गावरील टोल रद्द झाल्यामुळे भविष्यात एसटी प्रशासन तिकिटावरचा अधिभारही रद्द करण्याची शक्यता आहे. त्याचा प्रवाशांनाही फायदा होईल.


तूट कमी होण्यास मदत
महामंडळाला राज्यभरात टोलसाठी 127 कोटी रुपये खर्च करावे लागतात. यातील 22 टोलनाके बंद झाल्यामुळे निश्चितच फायदा होईल. टोलचा अधिभार तिकीट दरावर लावला नसल्याने दरवर्षी मोठय़ा प्रमाणात तूट सहन करावी लागते. आता ती कमी होईल. जीवनराव गोरे, अध्यक्ष, राज्य मार्ग परिवहन महामंडळ