आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुजा जर्मनीतील विद्यापीठात प्रथम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरची कन्या अनुजा जगताप हिने जर्मनीच्या कोबर्ग विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकवला आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ध्येयनिष्ठेच्या बळावर तिने आपला ठसा उमटवला आहे. इंजिनिअर अनुजा राजन जगताप हिने अॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट अॅन्ड सेन्सर टेक्नॉलॉजी या विषयात बेस्ट परफॉर्मन्स ऑफ कोर्सचा किताबही पटकावला आहे.
कोबर्ग विद्यापीठाचे अधिष्ठाता प्राेफेसर डॉ. डब्ल्यू हाऊपट यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. अनुजा हिने होशेले कोबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ अॅप्लायड सायन्स जर्मनी शांघाय स्टेट युनिव्हर्सिटी चायना येथून अभ्यासक्रम पूर्ण करून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली आहे. या विषयात प्रवेश घेणारी ती पहिली भारतीय कन्या अाहे.
समाजाभिमुख कामाची आवड
- समाजाच्या हितासाठी जे काम करता येईल त्यात मी जास्त रस घेणार आहे. समाजाभिमुख काम करण्यास मला आवडते. त्या दृष्टीने मी विविध प्रयोगांचा अभ्यास करते. तसे प्रयत्न पुढील काळातही करत राहाणार आहे. मी सोलापूरचे प्रतिनिधित्व करण्यात धन्यता मानते.''
अनुजा जगताप
अनुजाचा आम्हास अभिमान
- अनुजा आपल्या अभ्यासातून समाजाचा विचार मांडते याचे मला कौतुक वाटते. तिने अनेक प्रकल्पांचा अभ्यास केला आहे. तिची महेनत प्रचंड आहे. त्यामुळे तिने यश प्राप्त केले आहे. अनुजा ही आमची मुलगी असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.''
प्रा. राजन अॅड. नलिनी जगताप
शालेय शिक्षण मॉडर्न शाळेत
अनुजा जगताप हिचे शालेय शिक्षण मॉडर्न हायस्कूल तर उच्च माध्यमिक शिक्षण संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथून झाले आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण तिने जेएसपीएम पुणे येथून पूर्ण केले. जर्मनीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या काळात तिने सोलर एनर्जी, कचऱ्याचे नैसर्गिक विघटन या संदर्भातील अनेक प्रकल्पांना भेट दिली. भारतात याचा कसा वापर करता येईल याविषयी सामाजिक बांधिलकीतून अभ्यास करत आहे. जगताप क्लासेसचे संचालक राजन नलिनी जगताप यांची अनुजा ही कन्या आहे.
बातम्या आणखी आहेत...