आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारी ड्रेनेजमध्ये कोणीच उतरले नाही, कर्मचाऱ्यांत धास्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ड्रेनेजचेंबरमध्ये काम करताना महापालिका सफाई कर्मचारी राम नाईक हे मंगळवारी सकाळी गुदमरून मृत्यू पावले. या घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांत धास्ती आहे. बुधवारी शहरातील ड्रेनेज चेंबरमध्ये काम करण्याचे धाडस कोणीही दाखवले नाही. सुरक्षा साहित्य नसल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर साहित्य खरेदीच्या हालचाली झाल्या आहेत. मंगळवारच्या घटनेवरून धडा घेत महापालिकेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. अन्यथा पुढच्या दुर्घटनेनंतरच पुन्हा चर्चा सुरू होईल असे मत तज्ज्ञांनी मांडले.
गुन्हादाखल करा : ड्रेनेजकाम हाती घेण्यापूर्वी एक तास आधी चेंबरचे झाकण उघडले नाही. मेणबत्ती टाकून पाहणे आवश्यक होते ते केले नाही. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मनपाचे सार्वजनिक आरोग्य अधिकारी आरोग्य निरीक्षकांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे प्रदेश सचिव जे. एम. शिकलगार यांनी केले.
प्रशिक्षणाची गरज
^महापालिकेतसफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मुंबई, कलकत्ता येथे कर्मचाऱ्यांना वारंवार प्रशिक्षण दिले जाते. सोलापुरात आर्थिक अडचण आणि मनुष्यबळ कमी असल्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात नाही. काही ठिकाणी मॅनहोलमध्ये उतरून काम करावे लागते. त्यासाठी त्यांना सुरक्षित साहित्य आणि प्रशिक्षण दिले तर अशा घटना टाळता येतील. शिरीषकोटा, ड्रेनेजतज्ज्ञ

मनुष्यबळाचा वापर
मनपाकडेजेटिंग मशीन आहेत. या मशीनच्या साहाय्याने ड्रेनेज लाइन काही प्रमाणात साफ होते. पण चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करावा लागतो.