आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०वी फेरपरीक्षेसाठी २३ जूनपर्यंत करा अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.mahasscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावीत.
याच्या तारखा पुढीलप्रमाणे
आवेदनपत्रे नियमित शुल्कासह दि. २३ जूनपर्यंत विलंब शुल्कासह दि. २४ ते २७ पर्यंत भरणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांची यादी दि. १ जुलै रोजी जमा करावयाची आहेत. ही परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या शाळांमार्फत भरावी.
मुख्याध्यापकांना सूचना...
मुख्याध्यापकांनी ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात. श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै -ऑगस्ट २०१५ मार्च २०१६ अशा दोन संधी उपलब्ध राहतील. विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरण्याच्या तारखेपासून शाळांनी मंडळाकडे आवेदनपत्र सादर करण्याच्या तारखेपर्यंत म्हणजेच दिनांक जुलैपर्यंत काढलेले चलन ग्राह्य धरण्यात येईल.
शाळांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन भरलेल्या ( upload केलेल्या ) आवेदनपत्रांच्या प्रिंटेड प्रतीवर दिलेल्या तारखांप्रमाणे तसेच प्रचलित शुल्काप्रमाणे बँक ऑफ इंडियाच्या चलनाची प्रत संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करावयाची आहे. ऑनलाइन आवेदनपत्र भरताना मार्च २०१५ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाइन घेता येईल. दहावी परीक्षा सप्टेंबर / ऑक्टोबर २०१५ मध्ये घेतली जाणार नाही, याची विद्यार्थी, मुख्याध्यापक सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव राज्यमंडळ पुणे यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...