आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arif Khan News In Marathi, Narendra Modi, Gujrat

गुजरातेत रक्ताची होळी खेळणारा पंतप्रधान होईल कसा?, आरिफ खानचा मोदींवर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘भारत धर्मनिरपेक्ष देश असून यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गुजरातमध्ये रक्ताची होळी खेळणारा कधीच या देशाचा पंतप्रधान होऊ शकणार नाही,’ अशा शब्दात राज्याचे अल्पसंख्याक विभाग मंत्री आरिफ नसिम खान यांनी सोमवारी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला.


अल्पसंख्याक विकास विभागातर्फे सोलापुरात उर्दू घर आणि विद्यार्थिंनीकरीता वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्याच्या कोनशिला समारंभात अध्यक्षस्थानावरून खान बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘धर्माच्या नावावर मते मागून वाद निर्माण करून कोणी सत्तेवर येऊ शकत नाही. सभेमध्ये मुस्लिम बांधवांनी सत्कारप्रसंगी मोदी यांना दिलेल्या टोपीचा स्वीकार केला नाही. असा पक्षपातीपणा काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यामध्ये नाही. राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ या जातीयवादी संघटनेचा अजेंडा नरेंद्र मोदी देशात लागू करणार आहेत. भाजप हा आरएसएसचा एक भाग आहे. त्यासाठी अशा जातीयवादी पक्षांना थारा देऊ नका. हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन अशा जातीयवादी पक्षाचा नायनाट करावा,’ असे आवाहनही खान यांनी केले.


उर्दू पाकची राष्‍ट्रभाषा असणे गौरवास्पद : शिंदे
शिंदे म्हणाले, ‘उर्दू ही दुस-यांची नसून आपली भाषा आहे. आपली बोली उर्दू भाषा ही पाकिस्तानची राष्‍ट्रभाषा आहे ही गौरवास्पद बाब आहे. सोलापुरात उर्दू घर आणि अल्पसंख्याक विद्यार्थिंनीकरिता वसतिगृह उभारण्यात येत आहे. यामुळे अल्पसंख्याक समाजास लाभ होईल. सोलापूर शहरात उर्दूचे ग्रंथालय असावे. यातूनच एक नवी पिढी तयार होईल. शिक्षण असेल तरच भविष्य उज्ज्वल आहे. मुलींमध्ये खूप क्षमता असते म्हणूनच प्रणिती विकास कामामध्ये माझ्यापेक्षा सवाई आहे,’ अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या कन्येबद्दल भावना व्यक्त केल्या.