आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेज थ्री पार्ट्यांपासून सांभाळून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांनो आपण मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं. आपले आई-वडील बरेच काबाड कष्ट करून आपल्याला लहानचे मोठे करतात. या कष्टाचे मोल त्यांचे उपकार फेडण्यासाठी अापला हा जन्मही कमी पडेल.
आज नशा करणाऱ्या तरुण-तरुणींच्या संख्या वाढत चालली आहे. याला आता शासनाने रोखले पाहिजे, ते रोखले नाही, तर आताची काही नवीन तरुण पिढी वाया जाईल. मुलांना वेळेवर पाकीट खर्च देताना पैशाच्या आकडेवारीवर पालकांनी नजर ठेवावी. आपण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो आहोत, कदाचित याचा विसर पडलेल्या आजच्या तरुणाईला पालकच भानावर आणत नसतील तर मग कायद्याची तोफ त्यांच्यावर डागायला हवी. असल्या पेज थ्री पार्ट्यांनी या मध्यमवर्गीय तरुणांना कसले समाधान मिळते देव जाणो!
संपूर्ण आयुष्य या प्रकरणामुळे उद्ध्वस्त होते. बरे, आपले आईवडील असल्या कोर्टकचेरीतून सुटण्यासाठी भरमसाट पैसा मोजू शकत नाहीत, याची कल्पना येऊनही मध्यमवर्गीय मुले पार्ट्याचा नाद काही सोडत नाहीत. मुलांनो, किमान आपल्या पालकांचा तरी विचार करा. या व्यसनांच्या नादी लागून संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी करू नका. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे एकाच छताखाली राहणाऱ्या माणसांना दुसऱ्याबाबतची माहिती नसते. पैसा कमावून समाजात दिमाखदारपणे वावरणाऱ्या पालकांना आपल्या मुलांविषयी काळजीच मुळात उरलेली नाही. वेळ नाही म्हणून मुलांच्या तोंडावर हवा तेवढा पैसा फेकला की आपण आपली जबाबदारी पार पाडली, असाच समज त्यांचा होऊन जातो. अमाप पैसा खिशात खेळायला लागल्यावर मग तरुणांनाही संगतीचे भान राहात नाही आणि आपले चमचे बरोबर असावेत म्हणून मध्यमवर्गीय मुलांना ही मुले पोसतात. मग त्यांनाही याची चटक लागते.
मूठभर धनिक बाळे पार्ट्या गुप्तपणे करत असतील असे वाटत होते, पण प्रसिद्धी आयटीक्षेत्रात लहान वयात मिळणारा अमाप पैसा, बदललेल्या नीतीमत्तेच्या संकल्पना, संस्काराचा अभाव, तसेच मिळणा-या अमाप पैशाचे काय करायचे? यामुळे असली थेरं वाढत आहेत. काही पालक पैसा हातात दिला की आपण मोकळे असेच मानतात. पाल्य कोठे जातात, काय करतात, असे विचारत नाहीत. घराचे घरपण ही संकल्पना मोडकळीस येऊन ते फक्त लॉजिंग आणि बोर्डिंग स्वरूपात उरले की काय अशी शंका येते. मुलेही पैसा पदव्या मिळविल्या म्हणजे हात आभाळाला टेकले या आर्विभावात असतात. पालकांना जुमानत नाहीत. कुणी यांना दोन शब्द सुनावले की त्याची टर उडवायची हाच यांचा खाक्या.
जीवन, संस्कार नीतीमूल्ये हे सर्व मध्यमवर्गीयांसाठी काही प्रमाणात शिल्लक आहे. व्यसनाधीनतेला पोलिस, समाज, कायदा, पालक महाविद्यालये सगळे एक झाल्याशिवाय आवर घालता येणे अशक्य आहे. महाविद्यालयांच्या सर्व शाखांमधून एनसीसी, एनएसएस आदी एकेक वर्षी सक्तीचे करावे.
- साक्षी रेशीमकर, विद्यार्थिनी, भवानी पेठ