आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजर्षी शाहू महाराज : समतेच्या लढ्यातील कृतिशील अग्रणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकोणीसाव्या शतकात अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्या समाजसुधारकांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे व्यक्तित्व सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असे होते. तेव्हा संस्थाने होती. इतर संस्थानिकांप्रमाणे शाहू महाराज विलासी रंगेल जीवनात रममाण झाले नाहीत. हा राजा राजवाड्यातून दलितवाड्यात गेला. या भूतलावर अनेक राजे होऊन गेले असतील पण आपल्या प्रजेतील रंजल्या गांजलेल्या, तळागाळातील माणसाला केंद्रबिंदू करून राज्य करणारा एकमेव राजा एकच.

शाहू महाराज हे स्वत: पहिल्या प्रतीचे मल्ल होते. मेहनतीमुळे महाराजांची शरीरयष्टी सहा फूट चार इंच उंची, धिप्पाड छाती होती. सिंहासारखा जबडा हत्तीची ताकद असलेल्या भव्य बांध्याची कांतिमान शरीरयष्टी यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व लाखांत उठून दिसे. १८९४ मध्ये कुस्त्याचे जंगी मैदान भरविले. मल्लविद्येस त्यांनी प्रोत्साहन, उत्तेजन दिले. त्या काळी एकट्या कोल्हापूर शहरात शंभरापेक्षा जास्त तालमी होत्या. खासबाग मैदानाची निर्मिती केली. निवृत्त झालेल्या पैलवानांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना महाराजांनी पेन्शन, नोकरी, राहण्यास घर, दुकान किंवा जमीन देण्याची व्यवस्था केली. यावरून क्रीडा प्रवृत्तीला बळ देण्याचे काम महाराजांनी केले. हे काम आताच्या सरकारला जमेल का?

वेदोक्त प्रकरण
१९००मध्ये कार्तिक महिन्यात वेदोक्त प्रकरण गाजले. शाहू महाराज सकाळी पंचगंगेवर स्नान करून अंबाबाईचे आणि इतर देवतांचे दर्शन घेत असत. त्यावेळी मंत्र सांगण्यासाठी ब्राह्मण हजर होता. तो स्नान करता आला. तेव्हा महाराजांनी त्यांना त्याचे कारण विचारले असता तो उत्तरला, आपण शूद्र असल्याकारणाने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या सुधारणा राज्यकर्त्यांकडून करण्यात आल्या त्या सर्व सुधारणा शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये अगोदरच केल्या होत्या. समतेच्या लढ्यातील त्यांचे स्थान सुवर्णाक्षराने लिहिले गेले. अशा या महापुरुषास बहुजन आणि संपूर्ण महाराष्ट्रातर्फे कोटी कोटी प्रणाम.

दलितांसाठी पहिल्यांदा आरक्षण
दलितांनासक्तीचे मोफत शिक्षण दिले. १९२० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. त्यावेळी महाराजांनी आर्थिक साह्य केले. शाहू महाराज दलितांसाठी तन- मन- धन, आणि सत्ता यासह दलितांच्या पाठीशी उभे राहिले. डॉ. आंबेडकराच्या मूकनायक या नियतकालिकाच्या प्रकाशनास आर्थिक मदत केली. २६ जुलै १९०२ रोजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्राद्वारे मागासलेल्या जातींसाठी ५० टक्के जागा राखून ठेवण्याची क्रांतिकारक घोषणा केली.
बातम्या आणखी आहेत...