आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळासंदर्भात प्रश्न विचारा : शरद पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा - आपण दुष्काळी दौर्‍यावर आलो असून केवळ याबाबत मला प्रश्न विचार असे सांगत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्राने मंजूर केलेल्या शरीर संबंध कायद्यावर बोलणे टाळले. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी पवार शनिवारी मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांच्या दौर्‍यावर आले होते. मंगळवेढ्यातील लेंढवेचिंचोळी येथे दुष्काळी स्थितीची पाहणी त्यांनी केली.

या वेळी केंद्र शासनाने महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी लैंगिक छळ व अत्याचार विधेयक आणले आहे. परंतु या विधेयकात करण्यात आलेल्या तरतुदीसदंर्भात मंत्रिमंडळात मतभेद निर्माण झाल्याने हा विषय मंत्रिमंडळ गटाकडे सोपवला आहे. मंत्री गटाने संबंधांचे वय 18 वरून 16 करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची आणि आपली भूमिका काय असेल, असे विचारता मी दुष्काळी दौर्‍यावर आलो आहे. मला फक्त दुष्काळासंदर्भात प्रश्न विचारा, असे सांगत या विषयावर त्यांनी बोलणे टाळले.