आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांनी ‘धनुष्यबाण’ उचलताच पाटलांच्या ‘हात’चे गेले पद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत व त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत उडी घेतली. त्यामुळे काँग्रेसने राऊत यांचे सर्मथक, प्रा. संजय पाटील-चारेकर यांचे झेडपीचे विरोधी पक्षनेतेपद काढून घेतले आहे. आता अक्कलकोटचे महिबूब मुल्ला यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली आहे.

माजी आमदार राऊत यांच्यामुळे बार्शी तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढली. पंचायत समितीची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांपैकी पाच काँग्रेसचे सदस्य आहेत. पण, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राऊत व त्यांच्या गटाच्या सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला.
पाटील यांना हटवण्यासाठी काँग्रेस अंतर्गत गटबाजी सुरू झाली. उमाकांत राठोड हे विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक होते. माजी मंत्री म्हेत्रे-राठोड यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्ख्य लक्षात घेऊन र्शी. मुल्ला यांच्या निवडीची अधिकृत घोषणा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केली. झेडपी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांची भेट घेऊन र्शी. मुल्ला यांच्या निवडीचे पत्र दिले.

याबाबत मावळते विरोधी पक्षनेते प्रा. संजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. या निवडीमुळे जिपत नवी समीकरणे निर्माण झाली आहेत.
राऊतांचा संबंध नाही
आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेसने मुल्ला यांना संधी दिली. माजी आमदार राजेंद्र राऊत काँग्रेसमधून बाहेर पडल्याचा व विरोधी पक्षनेतेपद बदलाचा संबंध नाही. प्रा. संजय पाटील हे काँग्रेसचेच सदस्य आहेत. ’’ संतोष पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
म्हेत्रेंमुळे माझी निवड
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिफारशीमुळे माझी निवड झाली. पदाधिकारी व अधिकार्‍यांची सांगड घालून जिल्ह्यातील विकासकामे केली जातील. सत्ताधार्‍यांच्या मनमानी कारभाराला आळा घालून पारदर्शी कारभाराचा कायम आग्रह असेल.’’ महिबूब मुल्ला, विरोधी पक्षनेते झेडपी.