आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

भगवान नगरमधील घरांचे श्रेय लाटण्यावरून राजकारण सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भगवाननगर झोपडपट्टी पुनर्वसनअंतर्गत आतापर्यंत केवळ 50 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरांचे बांधकाम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या कामाचे र्शेय लाटता येणार नाही. त्यामुळे सध्या तयार असलेल्या 50 घरांचे वाटप करण्याची धडपड आमदार प्रणिती शिंदे करत आहेत तर दुसरीकडे आमदार शिंदे यांना याचे र्शेय जाऊ नये यासाठी माजी आमदार आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी नरसय्या आडम प्रयत्नरत असल्याची चर्चा रंगत आहे.
एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी सुधार कार्यक्रमांतर्गत (आयएचएसडीपी) शहरात चार झोपडपट्टय़ांच्या पुनर्वसनाचे काम होणार आहे. गेल्या वर्षी जगजीवनराम झोपडपट्टीचे बांधकाम झाल्यानंतर सर्व 93 घरांचे एकाच वेळी वाटप करण्यात आले. परंतु सध्या भगवान नगर झोपडपट्टी पुनर्वसनातील फक्त 50 घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून तेवढीच घरे वाटप व्हावीत यासाठी घाईगडबड केली जात आहे. लाभार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सत्ताधारी घाई करत आहेत तर माकपने प्रशासनासमोर मागण्यांची जंत्री ठेवली आहे.

भगवान नगर झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीमधील पन्नास घरे बांधनू पूर्ण आहेत. वीजजोडणी, शौचालय, पाणी, रंगरंगोटी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. ही इमारत तीन मजली असल्यामुळे वरच्या मजल्यावर पाणी जाणार नाही, ही एकमेव अडचण आहे. येथे पाण्याची टाकी बांधल्याशिवाय हे शक्य नाही. टाकीचे काम पूर्ण होईपर्यंत आमदार प्रणिती शिंदे हे स्वखर्चाने टिल्लू मोटार देणार आहेत. परंतु अद्यापही लाभार्थ्यांची यादीच तयार करण्यात आली नाही. आता छाननी केली जात आहे.