आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसची भिस्त समविचारी पक्षांवर; माकप तटस्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापौरपदाच्यानिवडणुकीच्या निमित्ताने आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, असे चित्र दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय समविचारी पक्षांवर काँग्रेसला विसंबून राहावे लागेल असे चित्र आहे. दुसरीकडे विधानसभेसाठी आणखी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी राजकीय चमत्कार घडविण्यासाठी महायुतीचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे सभागृह नेते महेश कोठे यांनी पक्षांतर केल्याने भाजप-सेना महापालिकेत सत्ताबदल घडवून आणेल असा अंदाज वर्तविला जात आहे. पण सध्या तरी तशी शक्यता दृष्टिपथात नाही.
खबरदारी म्हणून काँग्रेसने ४५ पैकी ४३ जणांना व्हीप बजावला आहे. कोठे समर्थक समजले जाणारे मधुकर आठवले यांनी सुरुवातीला व्हीप स्वीकारलेला नव्हता, पण नंतर तो स्वीकारला. मात्र, कोठेंचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी तो स्वीकारलेला नाही. तशी अधिकृत नोंद काँग्रेसने करून घेतली आहे.
काँग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादीचे १६ असे एकूण ५८ सदस्य आघाडीकडे आहेत. सत्ता टिकविण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. मात्र, काँग्रेसचे कोठे समर्थक समजले जाणारे काही सदस्य गैरहजर राहिले आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) तीन सदस्य, रिपाइं अपक्ष प्रक्येकी एक यांनी महायुतीच्या पारड्यात मत टाकले तर सत्तांतर होऊ शकते. माकपने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. असला तरीही सत्तांतराबाबतची उत्सुकता कायम आहे.
युतीला मतदान
शिवसेनेचे नगरसेवक युतीच्या नरसूबाई गदवालकर आणि मेनका चव्हाण यांना मते देतील. चमत्कार हा सांगून होत नाही. ते तर सभागृहात दिसेल.” प्रतापचव्हाण, शहरप्रमुख,शिवसेना
युतीचा धर्म पाळू
भारतीयजनता पक्ष हा युतीचा धर्म पाळणारा आहे. आमचे महापौरपदाचे उमेदवार नरसूबाई गदवालकर, उपमहापौरसाठी िशवसेनेचे मेनका चव्हाण यांना आमचे नगरसेवक मतदान करतील.” आमदारविजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष,भारतीय जनता पक्ष
रिपाइं युतीसोबत पण...
आबुटेंचेस्वागत. रिपाइंचे सदस्य महायुतीसोबतच राहतील.पण काँग्रेसने मागासवर्गीय प्रवर्गातील सुशीला आबुटे यांना उमेदवारी दिल्याने त्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. आबुटे यांचा मुरलीधर पात्रे होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी.” राजासरवदे, प्रदेशसरचिटणीस, रिपाइं (अ)
कोठेंविरोधात पत्र
महेशकोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तशा पुराव्यासहीत आम्ही विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याबाबत लवकरच कारवाई होईल. महापालिकेतील काँग्रेस सत्ता कायम राहील, कोणतीही अडचण येणार नाही. जातीयवादी पक्ष वरचढ ठरत असतील तर समविचारी पक्ष एकत्र येतात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे.” प्रकाशयलगुलवार, शहराध्यक्ष,काँग्रेस
माकप तटस्थ राहणार
आघाडीआणि महायुती दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवाय येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे सदस्य महापौर, उपमहापौर निवडीवेळी तटस्थ राहतील.” नरसय्याआडम, माजीआमदार, माकप
आघाडीच जिंकणार
महायुतीनेकितीही फाटाफूट करायचे ठरविले तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचीच सत्ता महापालिकेत कायम राहील. राष्ट्रवादी काँग्रेसने १६ सदस्यांना व्हीप बजावला आहे. महायुतीकडे केवळ ३४ सदस्य आहेत. काँग्रेसचे १५ सदस्य गैरहजर राहिले तरीही त्यांना बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणार नाही. महापौर उपमहापौर आमचाच असेल.” महेशगादेकर, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस