आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोठेंचा दोन डगरीवर हात; शेवटच्या क्षणी उत्तरमधूनही उमेदवारी दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरमध्यमधून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असताना महायुती तुटल्याने महेश कोठे गेल्या दोन दिवसांपासून थोडे चिंतेतच होते. शहर मध्य मार्ग योग्य की? पुन्हा शहर उत्तरची चाल धरावी याची ते चाचपणी करत होते. अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तीन मिनिटे उरली असताना त्यांनी शहर उत्तरमध्ये येऊन अपक्ष शिवसेना असे दोन अर्ज दाखल केले. शहर मध्यमध्ये तयारी केली असताना पुन्हा शहर उत्तर नको, अशी मानसिकता तयारी झाली. समविचारी मताचे विभाजन झाल्याने दगा फटका होऊ नये म्हणून पुन्हा पर्याय म्हणून कोठे यांनी शहर उत्तरमध्ये अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. शेवटच्या क्षणी २.५७ मिनिटांनी कोठे यांनी शहर उत्तरच्या निवडणूक कार्यालयात धाव घेतली. अर्ज दाखल केला.