सोलापूर- शहर उत्तरच्या विकासासाठी नागरिकांनी मला पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केले. मतदारसंघातील मंगोडेकर मंगल कार्यालय येथे आयोजित संपर्क अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात पुन्हा काँग्रेस पक्षाचेच सरकार येणार आहे.
विकासाची कामे फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो, असेही ते म्हणाले. या वेळी नगरसेवक दत्तू बंदपट्टे, अविनाश बनसोडे, सिद्राम जिंदम, शंकर जाधव आदींनी
आपले मनोगत व्यक्त केले. अशोक कलशेट्टी यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक अय्युब मनियार यांनी केले. मेघश्याम गौडा यांनी आभार मानले. या वेळी दत्तात्रय मंजेली, विठ्ठल मंठाळकर, मकण्णा मंजुळकर, मारुती गुजराती, आदी उपस्थित होते.