सोलापूर- दक्षिणसोलापूर मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे. विद्यमान आमदार दिलीप माने, माजी खासदार सुभाष देशमुख, बाळासाहेब शेळके, गणेश वानकर, युवराज चुंबळकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत पाटील यांच्यात खरी टक्कर आहे. काही नेत्यांवर मोर्चा, आंदोलन यांचे गुन्हे दाखल आहेत. आमदार माने यांच्यावर नवीपेठेत पार्किंगच्या कारणावरून हाणामारीचा गुन्हा दाखल आहे. शिवाय देशमुख, हसापुरे यांच्यावर किरकोळ स्वरूपाचे मोर्चा आंदोलनाचे गुन्हे आहेत. काही गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. बीएसएफ दलाचे पथक मंगळवारी सोलापुरात आले आहे. जुना तुळजापूर नाका येथे ते बंदोबस्तात मग्न पथक.
सुभाष देशमुख
यांच्यावरसतरा गुन्हे दाखल आहेत : स्वरूप : आचारसंहिता भंग, मोर्चा, आंदोलन असे मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, जेल रोड, लातूर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. काही गुन्हे न्यायप्रविष्ट.
सुरेश हसापुरे
यांच्यावरनऊ गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यांचे स्वरूप : फॅक्टरीज अॅक्ट 1948 चे कलम 92 आणि निगोशिएबल इंस्ट्रुमेंट अॅक्ट कलम 138 (चेक बाऊन्स). नऊ गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे न्यायालयात न्यायप्रविष्ट.
दिलीप माने
यांच्यावरनऊ गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यांचे स्वरूप. : नवीपेठ येथील पार्किंगच्या तक्रारीबद्दल गुन्हा. मुलतानी बेकरीजवजळ रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन, देगाव येथील पुलावरील पथकर रद्द करण्यासाठी आंदोलन, सीना नदीत सौंदणे कट येथून पाणी सोडण्यासाठी आंदोलन. यातील काही गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.
गांधीधाम येथून बीएसएफ फोर्स दाखल
गांधीधाम(गुजरात) येथून बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) पथक मंगळवारी सोलापुरात आले आहे. यापूर्वी छत्तीसगड, गुजरात येथून सीआयएसफ एसआरपीएफच्या दोन तुकड्या आल्या आहेत. बीएसएफची आलेली ही तिसरी तुकडी आहे. कर्नाटकातून बारा आॅक्टोबरला एक तुकडी येणार असल्याची माहिती उपायुक्त नीलेश अष्टेकर यांनी दिली. नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. पोलिस ठाण्यानुसार रूटमार्च सुरूच आहे. पेट्रोलिंग, सर्च मोहीम, संवेदनशील भागात पोलिसांचे लक्ष असल्याचे साहाय्यक आयुक्त शर्मिष्ठा घारगे यांनी सांगितले.