आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे वाटपाची अफवा आणि पोलिसांची झाली दमछाक शहर मध्य’मध्ये गोंधळ अफवांचे पीक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातीलतीन मतदार संघांपैकी शहर मध्य विधानसभा मतदार संघात मंगळवारी गोंधळाची स्थिती होती. पत्रके वाटप करणे, पैसे वाटप होत असल्याची चर्चा सोशल मीडियावरून दिवसभर सुरू होती. संशयास्पद हालचाली आढळणाऱ्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून चौकशी आणि तपासणी करण्यात येत होती. बेकायदेशीर बैठक घेतल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर मध्यमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, माकपचे नरसय्या आडम, शिवसेनेचे महेश कोठे, एमआयएमचे तौफीक शेख, भाजपच्या मोहिनी पतकी यांच्यात मुख्य लढत होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. पैसे वाटप होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाचे वसंत पवार यांनी शास्त्री नगर, विजापूर वेस परिसरात पाहणी केली. दत्त नगर परिसरात आमदार शिंदे यांनी बेकायदेशीर बैठक घेत असल्याची तक्रार आडम यांनी िनवडणूक निरीक्षकांकडे केली. तेथील व्हीडीओ चित्रण करण्यात आले. भरारी पथकाचे बाळासाहेब लामकाने यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पण, तेथे पैसे सापडले नाहीत. पूर्व भागात आरोप आणि प्रत्यारोप करणारी पत्रके या परिसरात वाटप करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. जाहीर प्रचार संपला असला तरी मंगळवारी सोशल मीडियावरून प्रचार सुरू होता.