आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडम यांच्या तक्रारीनंतर शिंदे यांच्यावर बेकायदेशीर बैठक प्रकरणी गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अमूककॉलनीत, सोसायटीत, चौकात पैसे वाटप होत असल्याचा अफवा मंगळवार सायंकाळपासूनच शहरात पसरत होत्या. पण, प्रत्यक्षात तसे काहीच चित्र दिसत नव्हते. काही अफवा सोशल मीडियावरून सुरू होत्या. पण, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी काहीच स्थिती दिसत नव्हती.
शहर मध्य, उत्तर, दक्षिण या तीनही मतदार संघात अफवांचे पेव फुटले होते. दरम्यान, याबाबत पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांना विचारले असता, नागरिकांकडून अथवा कुणाकडून माहिती आल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिका ऱ्यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तशी पाहणी होत होती.

आडमयांची तक्रार : शहरातअनेक ठिकाणी पैसे, मद्य जेवणावळी देऊन मतदारांना आमिष दाखवण्यात येत आहेत. भरारी पथकाकडे याबाबत तक्रार करूनही संबंधितावर कारवाई झाली नाही. यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक जी. व्यंकटरामा रेड्डी यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवदेन दिल्याची माहिती आडम मास्तर यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.