आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात कुठेही नसलेली चौकातील सभाबंदी सोलापुरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आचारसंहितेचे नियम,महत्त्वाच्या चौकात सभांना बंदी आणि प्रचारासाठी केवळ १६ दिवसांचा कालावधी मिळणार असल्यामुळे उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना एका विधानसभा मतदारसंघातील जवळपास तीन लाख मतदारांपर्यंत पोहोचणे खूपच कटकटीचे होऊन बसले आहे. तरीही उमेदवार आणि राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचू असा दावा करताहेत हे विशेष. जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने शहरातील शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील ५५ चौकात सभांना परवानगी द्यायची नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेत्यांच्या सभा घेण्यावर मर्यादा आल्या आहेत.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभही झाला आहे. पण प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे फार कोणी प्रचाराच्या कामाला अजून सुरुवात केलेली नाही. निवडणुकीचा माहोल अजून रंगलेला नाही. २७ सप्टेंबर रोजी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल, तोपर्यंत सर्व उमेदवार जाहीर झालेले असतील. त्या दिवसापासून अधिकृतपणे उमेदवारही प्रचाराला लागतील. तेथून १३ ऑक्टोबरपर्यंत त्यांचा प्रचार करावा लागेल. त्यासाठी केवळ उरतात १५ ते १६ दिवसच. त्या कालावधीत पक्षाचा जाहीरनामा पोहोचवणे, तीन लाख मतदारांना स्लिपा वाटणे, प्रत्यक्ष पोहोचणे यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. एका ठिकाणी जमवून ठिकठिकाणी सभा घेणे आता अडचणीचे झाले आहे. शहरातील महत्वाच्या चौकात सभा घेण्यास बंदी घातल्याने राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले
कायदा, सुव्यवस्थेसाठी सभा बंदीचा निर्णय कायदासुव्यस्था अबाधित राहावी, वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ही उपाययोजना आहे. सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पक्षाच्या वतीने सभेसाठी परवानगी घेत आहेत. आतापर्यंत ज्या चौकात सभांना बंदी आहे त्या ठिकाणी परवानगी वगळून पर्यायी चौक दिले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त आणि सभेसाठी मागीतलेली परवानगी यांचा सुवर्णमध्य साधून सभांना परवानगी दिली आहे, देणार आहोत. प्रदीपरासकर, पोलिसआयुक्त