आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरी मतदारांची मर्जी; आमदारांचा इलेक्शन फंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विधानसभानिवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खुश करण्यासाठी सर्वच आमदार विविध योजनांमधून विकासकामांना मंजुरी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे आमदार कोट्याची थैलीही सैल केली जाते आहे. गेल्या महिन्याभरात महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, सभामंडप, काँक्रिट रस्ते, बहुउद्देशीय सभागृह, हायमास्ट लाइट, दिवाबत्ती असे १२ कोटी ७६ लाख रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने प्राथमिक सोयी-सुविधांतर्गत प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र निधी वितरित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यास गेल्या दीड वर्षामध्ये ३५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. यामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी २१ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्राथमिक सोयी-सुविधांसाठी १२ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे.
प्रत्येक समाज घटकांना खुश करण्यासाठी सभागृहासाठी निधी देण्यात येत आहे. संत नामदेव महाराज, वडार समाज, संत वाल्मिकी समाज, अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सभागृह, अहिल्याबाई होळकर, मुस्लिम समाजासाठी शादीखाना, भुई समाज सभा मंडप, वीरशैव ककय्या समाज सभा मंडप बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख याप्रमाणे कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
रिक्षा भवन उभारणार
यानिधीतून काँक्रिट रस्ता, सभामंडप, सभागृह ही कामे होणार आहेत. प्रभाग ३२ मध्ये मनपाच्या जागेवर लाख रुपये खर्चातून रिक्षा भवन उभारण्यात येणार आहे.
शहरात४२ लाखांचे दिवे
प्राथमिकसोयी-सुविधेतंर्गत शहरात ४१ लाख ९७ हजार रुपयांचे दिवे बसवण्यात येत आहेत. यामध्ये प्रभाग ३०, ३२, ३६ आणि ३७ मध्ये २३ लाख रुपयांचे हायमास्ट दिवे बसवण्यात येत आहेत. याशिवाय पथदिवे बसवण्यासाठी निधी दिला आहे.