आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढोबळेंना विरोध, पालकमंत्र्यांनी साधली चुप्पी, काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्यावर सोपलांचे मौन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- काँग्रेसजिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी माजी पालकमंत्री मोहोळचे आमदार लक्ष्मण ढोबळे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. याविषयी पालकमंत्री दिलीप सोपल यांना विचारले असता त्यांनी संदिग्ध उत्तर देऊन राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडे बोट केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.
1राष्ट्रवादीअधिक जागांची मागणी करणार काय? याविषयी पक्षाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष चर्चा करून निर्णय घेतील. पक्षाच्या आदेशानुसार मी काम करणारा असल्याने जागा ताब्यात ठेवण्याबरोबरच त्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न असेल.
आपणराष्ट्रवादीकडून लढणार की पुन्हा अपक्ष?
मी प्रदेश कार्यालयाकडे बार्शी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक म्हणून अर्ज भरला आहे. मात्र मुलाखतीच्या दिवशी आजारी असल्याने उपस्थित राहू शकलो नाही. बार्शीची जागा कोणाकडे जाणार याचा निर्णय झालेला नाही. त्यानंतर इतर पक्षाकडून कोणता उमेदवार राहील हा प्रश्न राहणार आहे.
विधानसभानिवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे असेल ?
हा प्रदेश स्तरावरील निर्णय आहे. मी पालकमंत्री म्हणून इतरांची मदत करण्यापेक्षा मलाच सर्वांच्या मदतीची गरज आहे. मागील वेळी मी सर्वांची मदत घेऊन अपक्ष म्हणून निवडून आलो. यामुळे इतरांनीच माझ्यासाठी प्रयत्न करावेत.

अधिकजागांसाठी प्रयत्नशील आहात का?
जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांनी मागणी केली असेल. मला काही माहिती नाही. जागा अधिक मिळाल्यास त्याचे स्वागत आहे.
5काँग्रेसनेआमदार ढोबळे यांना विरोध केला आहे?
याचे उत्तर आमचे जिल्हाध्यक्षच देतील. मी भाष्य करणे योग्य नाही.