आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पस्तीस गावांचा प्रश्न सुटला पण पंढरपूरकडे दुर्लक्ष, पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा लेखाजोखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर-मंगळवेढाविधानसभा मतदार संघात २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी मंगळवेढा तालुक्याती पाणी प्रश्न, पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी, खड्डे तसेच धूळविरहित शहरातील रस्ते, केंद्राच्या पर्यटन सूचित पंढरपूरचा समावेश, प्राधिकरणाची त्वरित अंमलबजावणी आदी विविध आश्वासने रिडालोसचे उमेदवार असलेल्या भारत भालके यांनी दिली होती. त्यापैकी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांच्याकडून पंढरपूर शहर तालुक्यातील महत्त्वांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले.

राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत मतदारांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांना डावलून भालके यांना निवडून दिले होते.
या निवडणुकीत मोहितेंना अडचणीत आणण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न भालके यांनी प्रतिष्ठेचा केला होता. या प्रश्नाच्या पूर्ततेसाठी तब्बल पाच वर्षंाचा कालावधी खर्ची घालण्याची त्यांच्यावर वेळ आली. दुसरीकडे शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी भालके यांचे कट्टर विरोधक म्हणविणाऱ्या परिचारक गटातील एकाही नगरसेवकाने शहरातील खड्डे, धूळ या सारखे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा त्रास घेतला नाही. ३५ गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यात जरी भालकेंना यश आले असले तरी २००९ मधील निवडणुकी वेळी दिलेल्या आश्वासनांचे काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
नगरपालिका होती ताब्यात
नगरपालिकेचीसत्ता भालके यांच्या ताब्यात होती. मात्र तिथे ते वेगळे काम करून घेऊ शकले नाहीत.
हीआश्वासने दिली होती
एमआयडीसीसुरू करणे, खड्डे आणि धूळविरहित शहरातील रस्ते, चंद्रभागा नदीचा कायापालट, प्राधिकरणामार्फत पंढरपूरचा नियोजनबद्ध विकास, केंद्रीय पर्यटन यादीत पंढरपूरचा समावेश, भुयारी गटार योजनेचे काम करणे.
हीकामे लावली मार्गी
आषाढीयात्रा अनुदानात वाढ, तुकाराम जन्मचतुशताब्दी योजनेअंतर्गत शासनाकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा, पंढरपूर शहर तालुक्यात बसथांबे उभे केले, त्याचप्रमाणे शहरातील चंद्रभागा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा.
विकासालाचालना दिली
कृषीमहाविद्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. एमआयडीसीसंदर्भात स्थानिक राजकारण आडवे आले. त्यामुळे तो प्रश्न प्रलंिबत आहे. प्राधिकरणाचा मी फक्त सदस्य आहे. तरीसुद्धा आमदार या नात्याने सातत्याने बैठका बोलावल्या. तुकाराम जन्मचतुशताब्दी योजनेअंतर्गत शहरात निधी आणून विकासाला चालना दिली. भारतभालके, आमदार
आतापर्यंत आमदारकी भूषवलेल्या नेतेमंडळींकडून फक्त आश्वासने मिळाली आहेत. सर्वच नेत्यांनी वैयक्तिक राजकारणाशिवाय काहीच केले नाही. यशवंतडोंबाळी, मतदार,पंढरपूर