आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अगोदर महाराष्ट्र केसरी; नंतर बाजार कुस्ती, सुरू होणार विधानसभा निवडणुकीची धामधूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गणेशोत्सवाचीधामधूम सोमवारी थांबेल. त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुकीची सुरू होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात होत असलेल्या महापौर निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून महापािलकेतील संभाव्य सत्तापालटाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण प्रत्यक्षातील चित्र पाहिले तर त्यातील हवा अगोदरच निघून गेल्याचे दिसते.
महापौर निवडणुकीत महायुतीची राहिलेली शांत भूमिका यामुळे विधानसभेपूर्वी होणारी ही निवडणूक काँग्रेसला काहीसा दिलासा देणारी असलीतरी पुढच्या राजकारणात मात्र महापालिकेत काँग्रेसला सभागृह चालविणे कठीण जाईल, अशी खेळी खेळली जाण्याचीच शक्यता जास्त आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर बदलत चाललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस समोरची आव्हाने आणखी वाढताना दिसताहेत. तरीही लढण्याची पूर्ण तयारी करून उतरण्याचा इरादा पक्षाने व्यक्त केला आहे.
सत्तांतराचीनुसती चर्चा
कोठेयांच्या पक्षांतरानंतर महापालिकेतही काँग्रेसला धक्का बसणार अशी चर्चा रंगलेली होती. पण कोठेंना सत्तांतरासाठीची ‘मॅजिक फिगर’ गाठता आली नाही. त्यामुळे शिवसेनेला आता ‘महाराष्ट्र कुस्ती अगोदर, बाजार कुस्ती नंतर’ असा पवित्रा घ्यावा लागला आहे. शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी महापालिकेच्या राजकरणाबाबत ही प्रतिक्रिया नोंदली आहे. शहर मध्य मतदार संघात शिवसेना किती गांभीर्याने उतरणार असा प्रश्नही सध्या चर्चेत रंगला आहे. कारण कोठे यांच्या प्रवेशासाठी नारळी पौर्णिमेला उद्धव ठाकरे येणार असे सांगितले गेले, नंतर आदित्य ठाकरे येणार अशा चर्चा रंगल्या. कोठे ‘मातोश्री’वर जाऊन भगवा झेंडा खांद्यावर घेऊन आलेही. पण अजून तरी शिवसेनेचे नेते कोणी सोलापुरात आलेले नाहीत. महापौर निवडणुकीत महायुतीची शांत भूमिका यामुळे विधानसभेपूर्वी होणारी ही निवडणूक काँग्रेसला काहीसा दिलासा देणारी आहे. असे असले तरी पुढच्या राजकारणात मात्र महापालिकेत काँग्रेसला सभागृह चालविणे कठीण जाईल, अशी खेळी खेळली जाण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे शिवसेना पुढच्या काळात ती अधिक आक्रमक होईल, अशीच चिन्हे आहेत.