आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक प्रचारात होणार अंबेचा जागर, दुर्गेच्या स्वागताला सोलापूर सजले, पोलिसांचेही नियोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगत असतानाच गुरुवारपासून (दि. २५) नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. निवडणुकीची धांदल, अंबेचा जागर यामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण पडणार आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी प्रशासनानेही तयारी सुरू केली. कायदा आणि सुव्यवस्थेसह वाहतुकीच्या नियोजनाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दसरा आणि त्याच दिवशी होणा-या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारीही शहरात करण्यात येत आहे.
तुळजाभवानीचे प्रतिरूप असलेल्या रूपाभवानी दर्शनासाठी उत्सव काळात लाखो भक्तगण येतील. त्यामुळे मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाची बैठक मंगळवारी सायंकाळी झाली. मंत्री-चंडक, मड्डीवस्ती येथे वाहन पािर्कंगची व्यवस्था करण्याचे ठरले. शिवाय १० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली. दर्शनासाठी मंदिर परिसरात बॅरीकेड्स ठेवण्यात येतील.
मुख्य रस्त्यावर दुभाजकाच्या एकाच बाजूला दुकाने असणार आहेत. दुसरी बाजू वाहनांना ये-जा करण्यास राहील, अशी माहिती पोलिस निरीक्षक जयवंत खाडे यांनी दिली. दुय्यम निरीक्षक ईश्वर ओमासे, मंदिर समितीचे बंडू पवार यांच्यासह व्यापारी, विक्रेते बैठकीसाठी उपस्थित होते. मंदिर परिसरात बुधवारपासून दोन पाळ्यात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

दसरा, धम्मचक्र अन् बकरी ईद
निवडणुकीच्या लगबगीतच विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तदिन आणि बकरी ईदही येत आहे. विविध धर्मीयांचे हे उत्सव शांततेत होण्यासाठी पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. आयुक्त प्रदीप रासकर, उपायुक्त सुभाष बुरसे, नीलेश अष्टेकर, सहायक आयुक्त शर्मिष्ठा घारगे, महापलिका उपायुक्त म्याकलवार यांच्यासह वीज मंडळ अधिकारी, मंडळांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावरील समस्या दूर करण्याविषयी यावेळी चर्चा झाली.