आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रणिती शिंदेंच्या विरोधात आडम झाले आक्रमक, शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर मध्य मतदारसंघातील उमेदवार कॉ. नरसय्या आडम यांनी बुधवारी दुपारी कष्टकरी वर्ग समूहाच्या साथीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य सीताराम येचुरी होते. दत्त नगर येथून निघालेला हा जथ्था काही अंतरावर पोहोचताच पावसांच्या सरी कोसळल्या. पावसाच्या सरी झेलतच निघालेला जथ्था होम मैदानावर पोहोचला. दरम्यान, आडम यांनी येचुरी, एम. एच. शेख, आम आदमी पार्टीचे ललित बाबर यांच्यासोबत उत्तर तहसीलमध्ये वाहनाने जाऊन अर्ज दाखल केला.
पावसातहीकार्यकर्त्यांचे ठाण
खुल्यामैदानात ऐन पावसात सभा रंगली. होम मैदानात पोहोचल्यानंतर येचुरी यांची जाहीर सभा सुरू झाली. नेत्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी पावसात भिजत सभेला रंगत आणली. फक्त येचुरी यांच्या डोक्यावर छत्री होती. एक तास झालेल्या सभेच्या वेळी रिमझिम पाऊस होता. पाऊस आल्यामुळे होम मैदान येथे चिखल झाला होता. चिखलाची पर्वा करता कार्यकर्ते होम मैदानावर ठाण मांडून बसले होते. यातून त्यांची पक्षाच्या प्रती आणि मास्तरांच्या प्रती निष्ठा तसेच मास्तरांचे शक्तिप्रदर्शन दिसून आले.
मोदीसरकारवर हल्ला
देशातील कष्टकऱ्यांना देशोधडीला लावून मोदी हे साम्राज्यवादी धोरणांचीच री ओढत असल्याचा आरोप येचुरी यांनी केला. शंभर दिवसांत विकासाऐवजी बेरोजगारीत वाढ झाली. महागाई वाढतेच आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली, त्यासाठी माकपा हाच पर्याय आहे असे ते म्हणाले.
1 पंधराशे कोटींत सोलापूरचे नंदनवन झाले असते
सोलापुरातपंधराशे कोटींची विकास कामे केल्याचा कांगावा आमदार प्रणिती शिंदे करत आहेत. पंधराशे कोटींत सोलापूरचे नंदनवन झाले असते. पंधराशे कोटी रुपयांची कामे कुठे आणि कशी केली, असा सवाल आडम यांनी केला.
2५० टक्के पाणीपट्टी कपातीचे गाजरच
पन्नासटक्के पाणीपट्टी कपात करण्याचा निर्णय महापालिकेच्या सभागृहात घेण्यात आला. परंतु राज्य सरकारची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत याला काहीच अर्थ नाही. सद्यस्थितीत तरी प्रणिती यांच्या सांगण्यावरूनचा निर्णय गाजरच.
निवडून द्या इर्दला पोलिस मुख्यालय मशिदीत नमाज अदा करू
तुम्हीमला निवडून द्या येणा-या ईदची नमाज पोलिस मुख्यालयातील मशिदीमध्ये अदा करू, असे आवाहन आडम यांनी केले. येत्या पाच वर्षांमध्ये पन्नास हजार घरे बांधून देऊ आणि पाच हजार पेन्शन देऊ असे ते म्हणाले.