आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपमध्ये बंडाचे निशाण, नगरसेवक सुरेश पाटीलसह चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्यात महायुतीमध्ये जागांची रस्सीखेच सुरू असतानाच सोलापुरात भाजपचा हक्काचा गढ समजल्या जाणाऱ्या शहर उत्तर मतदारसंघात विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधी गटातील चार नगरसेवकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत बंडाचे निशाण म्हणून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरसेवक सुरेश पाटील, रोहिणी तडवळकर, मोहिनी पत्की, नागेश वल्याळ यांनी शक्तिप्रदर्शन करत बुधवारी अर्ज दाखल केले. भाजपचे झेंडे घेऊनच समर्थक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.
भवानी पेठेतील घोंगडेवस्तीमधील गुरुदत्त चौकातून दुपारी १२.३० च्या सुमारास पदयात्रेस प्रारंभ झाला. गजी ढोल, बँजो पथक, हलगी असा निनाद तर कार्यकर्त्यांच्या हाती भाजप, रिपाइंचे झेंडे. रॅलीतील केसरी, पिवळा, हिरव्या रंगाचे झेंडेही होते. रॅलीला पावसाचा व्यत्यय आला.
पदयात्रेतील एका बग्गीत कै. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, लिंगराज वल्याळ यांच्या प्रतिमा होत्या. या पदयात्रेत नगरसेवक नागेश वल्याळ, पांडुरंग दिड्डी, नगरसेविका रोहिणी तडवळकर, मोहिनी पत्की, नरसूबाई गदवालकर, श्रीकांचना यन्नम, राजू हौशेट्टी, वीरभद्र बसवंती, राम तडवळकर, बंडू कुलकर्णी यांचा समावेश होता.