आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोडून गेलेल्यांना कॉंग्रेसचे दरवाजे उघडे, पण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सत्तेच्या अपेक्षेने काँग्रेसमधून बाहेर पडलेले शहर जिल्ह्यातील काही नेते-कार्यकर्ते सध्याच्या राजकीय घडामोडीनंतर पुन्हा कांग्रेसमध्ये घेण्याची विनंती करत आहेत. काहीजण फोनद्वारे संपर्क साधत आहेत. झालेल्या चुकीची जाहीर कबुली करणा-यांना पुन्हा पक्षात घेण्यात येईल. पण, शिक्षा म्हणून त्यांना तत्काळ कोणतीही पदे देण्यात येणार नाही. काही वर्षे त्यांना थांबावे लागेल, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोडून गेलेल्यांना कॉंग्रेसचे दरवाजे खुले असल्याचा संदेश यातून कॉंग्रेसने दिल्याचे स्पष्ट झाले.
यलगुलवार यांनी शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. एमआयएमचे आमदार आेवीसी यांनी जाहीर सभेत काँग्रेस माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांचे खंडन काँग्रेसने पाच दिवसानंतर केले. माजी महापौर यू. एन. बेरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
बेरिया म्हणाले, “चार दिवसांपूर्वी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन आेवीसी यांनी सभेत केलेले काँग्रेस शिंदे यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. जाती हिंसाचार विधेयक कायदा काँग्रेसनेच लोकसभेत मंजुरीसाठी आणला होता. पण, विरोधकांनी तो हाणून पाडला होता. आेवीसींचे सर्व आरोप संकुचित मनोवृत्तीचे खोटारडे होते. धार्मिकतेच्या नावावर तरुणांची दिशाभूल त्यांनी केलीय. मुस्लिम समाजाच्या सुख-दुखामध्ये काँग्रेसच सक्रीय सहभागी असतो, असेही त्यांनी सांगितले.
कोठेंनाअतिउत्साह भोवला
मागीलविधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमध्ये काँग्रेसेच उमेदवार महेश कोठेंना त्यांचाच अतिउत्साह भोवला. त्या मतदारसंघात इतर कोणीही हस्तक्षेप करूनये, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे एकाही नेत्याची सभा झाली नाही. त्यांचीच इच्छा नसल्यामुळे तसे घडले. पण, त्यांच्या चुकांचे खापर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर फोडणे, चुकीचे आहे. उज्वला शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभावनंतर काँग्रेसच्या एकाही जबाबदार पदाधिकार्याने त्यांच्यावर आरोप केले नव्हते, असेही यलगुलवार यांनी सांगितले.
विष्णूपंत कोठेंवरील कारवाईचे समर्थन
महेशकोठे शिवसेनेत गेल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली. त्यावेळी विष्णूपंत कोठे यांनी काँग्रेस सोबतच राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांना काँग्रेसने मान, सन्मान दिलेला होताच. पण, त्यांचे नाव छायाचित्र महेश कोठेंच्या जाहिरातींमध्ये होते. काही ठिकाणच्या कोपरा सभेला विष्णूपंत कोठे उपस्थित असल्याचा अहवाल काँग्रेस कमिटीला मिळाला होता. त्यामुळे काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा यांनी कारवाईची मागणी केली, असे सांगत शहराध्यक्ष यलगुलवार यांनी दामयांच्या मागणीचे समर्थन केले.