आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाव सपाटेंचे, अर्ज भरला गादेकरांनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहर उत्तर मतदारसंघातून मनोहर सपाटे यांचे नाव पक्षाने जाहीर केले. पक्षाने सपाटे यांच्यासाठी एबी फॉर्म पाठवूनही दिला. मात्र शनिवारी सकाळी शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी मनोहर सपाटे यांच्यासाठी पाठवलेला एबी फॉर्म स्वत:साठी वापरून अर्जही दाखल केला आणि सपाटे हतबल होऊन पाहतच राहिले. सपाटे यांनी गादेकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप करीत याचा पक्षनेतृत्वाला जाब विचारणार असल्याचे सांगितले.

आघाडी युती तुटल्याने जिल्ह्यातील राजकारणात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही राजकीय उलथापालथ पाहण्यास मिळाली. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील उमेदवारी जाहीर केली, यामध्ये उत्तर मतदारसंघातून मनोहर सपाटे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्याचे एबी फॉर्म आमदार दीपक साळुंखे यांच्याकडे आले होते. शहर मध्य, शहर उत्तर दक्षिण सोलापूर या तीनही मतदारसंघाच्या उमेदवारांचे एबी फॉर्म शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्याकडे देण्यात आले. शुक्रवारी रात्री सपाटे यांना शनिवारी सकाळी एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सकाळी सपाटे गादेकर यांच्याकडे गेले. प्रांतिककडून मला अर्ज भरण्यास सांगितल्याचे गादेकर यांनी सपाटे यांना सांगितले. त्यावर सपाटे आवाक होत थेट निवडणूक कार्यालय गाठले.