आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections,,latest News In Divya Marathi

शक्तिप्रदर्शनाने शहर ढवळले, ' मध्य'मधून प्रणिती शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ढोल-ताशांचागजर, फुलांची उधळण करत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्वांना मार्गदर्शन केल्यानंतर कॉंग्रेस भवन येथून रॅली निघाली.
आमदार दिलीप माने, शहर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ चाकोते, महापौर सुशीला आबुटे, शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, संजय हेमगड्डी, यू. एन. बेरिया, माजी आमदार निर्मला ठोकळ, माजी महापौर अलका राठोड आदी उपस्थित होते. पदयात्रा रंगभवन, सातरस्ता, लष्कर, जगदंबा चौक, मुर्गीनाला, पत्रकारनगर मार्गे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयजवळ आली. आमदार शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीच्या पुढे आमदार शिंदेंनी केलेल्या कामांचा विकासरथ होता. फटाक्यांच्या माळा उडवल्याने धूर अन् उन्हाच्या तडाख्यामुळे उज्ज्वला शिंदे यांना त्रास होऊ लागला. त्यांना तत्काळ वाहनामध्ये बसवून पुढे पाठवण्यात आले. अर्ज दाखल करताना सौ. शिंदे सर्वात पुढे होत्या.
"मध्य'मधून तौफिकशेख
सोलापूर एमआयएमचे तौफिक शेख यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखला केला. फॉरेस्ट येथील ताज हॉटेल समोरून सकाळी अकरा वाजता निघालेली रॅली चांदणी चौक, महापौर बंगला, डफरीन चौक, हरिभाई देवकरण प्रशाला, रंगभवनमार्गे सिव्हिल चौकात आली आणि तेथे रॅलीचा समारोप झाला. आणि तौफिक शेख यांनी हैदराबादच्या नेत्यांसोबत अर्ज दाखल केला.
रॅलीत तरुणांचीच उपस्थिती दिसून आली. महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी झाले होते. हिरव्या झेंड्यांसोबत निळे आणि पिवळे झेंडेही होते. आमदार मुमताजअहमद खान, नगरसेवक बिलाल शेख, शहराध्यक्ष शकील शेख, अश्पाक शेख, आसिफ राजे, जब्बार बसरी, मन्सूर इनामदार, वसीम शेख, कोमारो सय्यद, इम्तियाज अल्लोळी, अखलाक दिना आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर अर्जदाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी शहर "उत्तर'मधून भाजपचे विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादीकडून महेश गादेकर, शिवसेनेकडून उत्तमप्रकाश खंदारे आणि महेश कोठे यांनी अर्ज दाखल केला. कोठे यांनी शिवसेनेकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. यासाठी त्यांनी शिवसेनेच्या एबी फाॅर्मची झेराॅक्स दिली आहे. शनिवारपर्यंत शहर उत्तरमध्ये अर्ज दाखल केलेल्यांची संख्या ३३ झाली.
शनिवारीदाखल अर्ज : महेशगादेकर (राष्ट्रवादी), उत्तमप्रकाश खंदारे (शिवसेना), विजयकुमार देशमुख (भाजप), विष्णुपंत गावडे (एमआयएम), मनिषा माने, महेश कोठे (शिवसेना, अपक्ष), अनिल व्यास (मनसे), लक्ष्मीनारायण कुचन, हरिश सोमा, इम्तियाज कल्याणी, राजकुमार कदम, बशीर शेख, सुशांत इरकशेट्टी, नासीर बागवान, विक्रम कसबे, अल्ताफ कुरेशी, खुद्दूस कांबळे, मनोहर सपाटे, वीरभद्रेश्वर बसवंती (सर्व अपक्ष).
दिवसभरातील महत्त्वाचे :
२.५३वाजता महेश कोठे अर्ज भरण्यासाठी धावत निवडणूक कार्यालयात आले. त्यामुळे बरडे पुन्हा आले. त्यांना कार्यालयात येण्यास मज्जाव. बाहेर आल्यावर ते म्हणाले, आता काही बोलणार नाही.
काँग्रेसच्या रॅलीवर दगडफेक, जखमी
शहरमध्य मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या रॅलीवर दोघा महिलांनी दगडफेक करून सहाजणांना जखमी केल्याची घटना घडली. सातरस्ता परिसरातील गरूड बंगल्याजवळून सुधीर अर्पाटमेंटच्या टेरेसवरून दगडफेक झाली. या दगडफेकीत शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ज्योती वाघमारे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती गोवर्धन कमटम यांच्यासह सहाजण जखमी झाले आहेत. कमटम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून बारा टाके पडले आहेत. आसमा मुजावर एका तरुणीवर (रा. सुधीर अपार्टमेंट, गरूड बंगल्याजवळ) सदर बझार पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला. कमटम, वाघमारे, सागर आनंदकर, शुभांगी लिंगराज, भारती एक्कलदेवी, लक्ष्मी आसादे (रा. सोलापूर) हे सहाजण जखमी झाले आहेत.
दक्षिण सोलापूर
दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब शेळके भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले. एकूण ५७ जणांचे ६७ अर्ज दाखल झाले. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३६ जणांनी ४२ अर्ज दाखल केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे शेळके यांनी समर्थकांसह पदयात्रेने अर्ज भरला. चार पुतळा चौकापासून त्यांची पदयात्रा निघाली. त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. या वेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आनंदराव देवकते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, हारुण सय्यद, भारत जाधव, बाजार समिती संचालक अविनाश मार्तंडे, पिरप्पा म्हेत्रे यांच्यासह देवकते, शेळके समर्थक होते. तसेच यात काँग्रेस कार्यकर्त्यांचाच भरणा जास्त होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले नाहीत. राष्ट्रवादीचे गोपाळराव कोरे, काँग्रेसचे जाफरताज पाटील, हरिष पाटील यांनीही अर्ज भरले.
भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांनी सात रस्ता येथून फुलांनी सजवलेल्या वाहनातून मिरवणुकीने येऊन अर्ज भरला. या वेळी लोकमंगल समूहातील कार्यकर्त्यांची तरुणांची गर्दी होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, रोहन देशमुख, नगरसेविका मोहिनी पतकी, तालुकाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, शिवानंद वरशेट्टी, भारत बिराजदार, सुरेश बगले, रामप्पा चिवडशेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते.