आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्ताकेंद्र आबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान, राष्ट्रवादीने ११ पैकी १० ठिकाणी दिले उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सांगोला वगळता सर्वच मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहेत मात्र काही मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद पाहता उमेदवारांची अनामत रक्कम तरी वाचेल का? अशी शंका येते. जिल्ह्यातील सर्वाधिक सत्तास्थाने ताब्यात असलेली राष्ट्रवादी काँग्रेस या बहुरंगी लढतीमध्ये पुन्हा जिल्ह्याची सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवेल का? याविषयी वेट अॅण्ड वॉच ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
माळशिरस, माढा या मतदारसंघातील पक्षाची ताकद पाहता विद्यमान आमदार हनुमंत डोळस बबनराव शिंदे यांना विजयाच्या जवळ जाता येण्यासारखी परिस्थिती आहे. बार्शी मतदारसंघामध्ये विद्यमान पालकमंत्री यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत यांच्याबरोबरच शिवसेना, भाजप उमेदवारांचे आव्हान असणार आहे. मोहोळ मतदारसंघामध्ये पक्षाने केलेला बदल पक्षाच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात कस
अक्कलकोटमध्येमल्लिकार्जुन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र एबी फॉर्म मात्र दिलीप सिद्धे यांना देण्यात आले आहे. सिद्धे यांच्या उमेदवारीचा लाभ इतर पक्षांना होण्यास मदत होणार आहे. शहर उत्तर शहर मध्य मतदारसंघामध्ये महेश गादेकर विद्या लोलगे यांना उमेदवारी दिली आहे. गटबाजीचा फटका बसु शकेल.
करमाळ्यात आव्हान
करमाळायेथे रश्मी बागल यांच्यासमोर स्वाभिमानीचे संजय शिंदे यांनी आव्हान उभे केले आहे. प्रशांत परिचारक यांच्या पक्षांतरामुळे पंढरपूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातून गेल्यातच जमा आहे. याठिकाणी आमदार भालके परिचारक यांच्यातच लढत होणार आहे. दक्षिण सोलापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही. मात्र काँग्रेसचे बाळासाहेब शेळके यांना जातीय समीकरणावर उमेदवारी बहाल करण्यात आली.
करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीचे उमेदवार संजय विठ्ठलराव शिंदे यांना शह देण्यासाठी चांगलीच कंबर कसल्याचे दिसते. करमाळा मतदारसंघामध्ये संजय शिंदे नावाचे इतर पाच उमेदवार दिले आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडीकडून संजय नामदेव शिंदे तर अपक्ष म्हणून संजय लिंबराज शिंदे, संजय महादेव शिंदे, संजय पांडुरंग शिंदे, संजय नामदेव शिंदे या उमेदवारांनी अर्ज भरला आहे. या उमेदवारांना दृष्टी देणारा संजय कोण ? अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.